धर्मांतरासाठी महिलेवर सामूहिक बलात्कार:पुण्यात 3 जणांनी कडून बंदुकीच्या धाकावर केला अत्याचार; VIDEO व्हायरल करण्याची धमकी
6 hours ago
1
पुण्यात एका महिलेवर एका विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्यासाठी सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी या महिलेवर केवळ बलात्कारच केला नाही तर त्याचा व्हिडिओही काढला आहे. त्यामुळे या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुण्यात एका महिलेला ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ३२ वर्षीय पीडित महिलेला एका ३० वर्षीय महिलेने तिच्या घरात डांबून ठेवले. त्यानंतर ५५ वर्षीय आणि ३० वर्षीय दोन पुरुषांनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि या कृत्याचा व्हिडिओही काढला. सदर घटना एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. आरोपींनी पीडितेला धर्मांतरासाठी प्रोत्साहित केले, मात्र तिने नकार दिल्यानंतर तिला घरात कोंडून ठेवले. आरोपींनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर ३० वर्षीय आरोपीने तिला स्वतःच्या घरी नेऊन वारंवार बलात्कार केला. आरोपींनी पीडित महिलेच्या घरातील देवघरातील मूर्तींची तोडफोड करून तिच्या धार्मिक भावनाही दुखावल्या. पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे पुढील तपास करत आहेत. हे ही वाचा... हे ही वाचा... अमित शहांची भुजबळांशी जवळ बसवून चर्चा:नाशिकच्या कार्यक्रमात दोघांत संवाद; नाराज भुजबळ भाजपमध्ये जाण्याची रंगली चर्चा नाशिक - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथील एका कार्यक्रमात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते छगन भुजबळ यांना आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवले. यामुळे भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याविषयीची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर महायुती सरकार मराठ्यांना का छळत आहे?:मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सवाल; उद्यापासून आंतरवाली सराटीत करणार उपोषण जालना - मनोज जरांगे पाटील शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी राज्यातील महायुती सरकारविरोधात दोनहात करणार आहेत. त्यांनी शुक्रवारी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत सरकार गरीब मराठा समाजाचा नाहक छळवाद करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे की नाही हे आता सिद्ध होईल. त्यांनी मराठ्यांशी गद्दारी व बेईमानी करू नये, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)