उमरगा : पुढारी वृत्तसेवा , लातूर कलबर्गी मार्गावर आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास भीषण अपघात, नारंगवाडी साठवण तलावाजवळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील यांच्या इनोव्हा कार व पिक अपची समोरा समोर धडक, अपघातात पिक अप मधील पाच जण गंभीर जखमी झाले.
अजय सिद्राम जमादार (वय ४०), शंकर आप्पाराव लवटे (वय ५५ ), शंकर माणीक जमादार (वय ४०), धनराज वडदरे (वय ४५) सर्व जण रा कराळी ता उमरगा , विठ्ठल निवृत्ती माने (वय ५५ ) रा मदनेवाडी अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
तर बाबा पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात इतका भिषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच यातील सर्व जखमींना सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रूग्णवाहीकेतून उमरगा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.