नागपुरात दुचाकीस्वाराकडून एक कोटी जप्त:पैसे हवालाचे असल्याचा पोलिसांना संशय, आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी

6 days ago 2
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैसे जप्त करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. तहसील पोलिसांनी मोठी कारवाई करत एका दुचाकीस्वाराकडून तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्र सिंघम यांनी दिली. पोलिसांनी दुचाकीचालकाला ताब्यात घेतले आहे. साकीर खान हाजी नसीर खान (४२, रा. यशोधरानगर) असे आरोपीचे नाव आहे. चौकशीदरम्यान ही रक्कम कुणाची होती, याबाबत आरोपीला माहिती देता आली नाही. प्राथमिक तपासात हवालाचा पैसा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मिळालेल्या पैशांबाबत एकच चर्चा सुरू आहे. दुचाकीवरून येणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांना संशय आला. त्याआधारे त्यांची गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे एका थैलीत पोलिसांना १ कोटी ३५ लाख रुपये रोख सापडले. पैसे सापडताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. ही रक्कम कुणाची आहे, अशी विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच पैशाची कोणतीही कागदपत्रे सादर करू शकला नाही. निवडणुकीच्या वेळी मिळालेली रक्कम पाहता पोलिसांनी पैसे आणि दुचाकी असा एकूण १ कोटी ५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी साकीर खान हाजी नसीर खान हा बिन्नी नावाच्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. याअगोदरही त्याने बिन्नी याच्याकडे पैसे सुपूर्द केले होते. त्याने इकडून तिकडे बदली करून सोडण्याचे काम केले होते. आजही आरोपी साकीर खान हा कुणाला तरी मोठी रक्कम घेऊन सोडणार असल्याची गुप्त माहिती तहसील पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article