Chhaava Movie Song: सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात अभिनेत विकी कौशल व दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अनेक मराठी कलाकार देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे एकाच वेळी प्रेक्षकांच्या भेटीला मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रिटी येणार आहे.
‘छावा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर निर्मात्यांनी सिनेमातल्या पहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. गाण्याच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. दरम्यान, गाण्याच्या टीझरमध्ये लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्रींची झलक पाहायला मिळत आहे.
‘छावा’ सिनेमातील पहिलं गाणं ‘जाने तू’ ची झलक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. गाणं देखील शुक्रवारी चाहत्यांच्या भेटीस आलं आहे. गाण्यातील एका सीनमध्ये येसूबाई (रश्मिका मंदाना) छत्रपती संभाजी महाराजांचं (विकी कौशल) औक्षण करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याच सीनमध्ये रश्मिकाच्या बाजूला दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर उभ्या असल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ सिनेमातून नीलकांती पाटेकर कलाविश्वात पुनरागमन करणार आहेत. शिवाय सिनेमात सिनेमातून नीलकांती पाटेकर धाराऊंची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. धाराऊ या शंभूराजेंच्या दूधआई होत्या. सिनेमातील नव्या बाजू समोर येत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘छावा’ सिनेमातील पहिलं गाणं ‘जाने तू’ बद्दल सांगायचं झालं तर, संगीतकार ए आर रेहमान यांनी या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली. तर अरिजित सिंहच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलेलं आहे. गाणं देखील चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे.