केंद्रीय गृहमत्री अमित शाह यांनी त्र्यंबकेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले.Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 11:23 am
Updated on
:
24 Jan 2025, 11:23 am
त्र्यंबकेश्वरः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिर सभामंडपात त्यांनी संकल्प पूजा अभिषेक केला. यावेळी त्यांचे समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आ.हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.
पूजेचे पौरोहित्य भाजपा माजी शहराध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे, महेंद्र थेटे, निरज शिखरे यांनी केले. त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कार्यालय इमारतीत स्वागत करण्यात आले यावेळी विश्वस्त चेअरमन नितीन जीवने, सचिव डॉ.श्रिया देवचके, कैलास घुले, रुपाली भुतडा, मनोज थेटे, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, प्रदीप तुंगार, सत्यप्रिय शुक्ल, प्रशासन अधिकारी समीर वैद्य आदी उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्ट विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी देशाचे गृहमंत्री यांना आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन त्र्यंबक नगरीचा सर्वांगीण विकास करावा यासाठी निवेदन दिले.