निवडणूक उत्सव साजरा करण्या सज्ज आम्ही लोकशाहीचे पाईक, श्रीरामपुरात 311 मतदान केंद्रावर पथके रवाना, 3 लाख 9 हजार मतदार
1 day ago
2
श्रीरामपूर विधानसभा मतदासंघातील निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी ३११ मतदान केंद्रावर तितकीच पथके मंगळवारी (१९ नोव्हेंबर) रवाना झाली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद वाघ, तहसीलदार नीलेश काळे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, विकास नवाळे, कृषी अधिकारी उल्हास राक्षे, संदीप रुद्राक्ष, नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, सुनिता धिमते, हेमलता वाकडे, बाबासाहेब गोसावी, दत्तात्रय शेकटकर आदींसह सर्व अधिकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहेत. श्रीरामपूर मतदारसंघात ३११ मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षासह एक पोलिस व इतर सहायक, असे सहा कर्मचारी असतील. असे एकूण १८६६ अधिकारी-कर्मचारी, शिवाय १५५ मतदान अधिकारी-कर्मचारी राखीव आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ५३ हजार ३७९ मतदार, तर स्त्री १ लाख ५३ हजार ३७९, तृतीय पंथी-६३, दिव्यांग- २ हजार ८३ असे एकूण ३ लाख ९ हजार १५१ मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मंगळवारीच कर्मचाऱ्यांची पथके मतदान केंद्रावर रवाना झाली. मतदान साहित्याचे वाटप व जमा करण्यासाठी ३१ टेबलचे नियोजन केले होते. प्रत्येक टेबलवर १० मतदान केंद्रांचे साहित्य वाटप करण्यात आल्याने, विना गोंधळात साहित्य वाटप प्रक्रिया पार पडली. त्याचप्रमाणे साहित्य जमा करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे अत्यंत कमी वेळेत साहित्य देवघेव प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदान केंद्रावर देखरेख करण्यासाठी २८ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त केलेले आहेत. इतर कामासाठी १७१० कर्मचारी नियुक्त केले आहेत. श्रीरामपूर मतदारसंघातीस ३११ पैकी १५६ मतदान केंद्रांवर थेट प्रेक्षपण केले जाणार आहे. शिवाय १५ केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्त केलेली आहे. सेंट झेविअर स्कूल, निपाणी वडगाव, भास्करराव गलांडे पा. विद्यालय अशोकनगर, यशवंत विद्यालय, पढेगाव या तीन ठिकाणी आदर्श मतदान केंद्र, लोकमान्य टिळक वाचनालय आगाशे हॉल येथे पूर्ण महिला कर्मचारी, डी. डी. काचोळे विद्यालयात खोली क्रमांक ४ पूर्ण तरूण कर्मचारी, पटेल विद्यालयात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असेल. ४५ कर्मचाऱ्यांची दांडी १० मतदान अधिकारी, ८ प्रथम अधिकारी, ८ द्वितीय अधिकारी तर राखीवमधील ६ मतदान अधिकारी, ३ प्रथम अधिकारी व ८ द्वितीय अधिकारी गैरहजर राहिले. या ४५ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, आपली ही कृती निवडणुकीसारख्या कामात अडथळा निर्माण करणारी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)