पणजी : केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ‘घरत गणपती’ चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर.Pudhari File Photo
Published on
:
28 Nov 2024, 11:53 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:53 pm
पणजी : ‘इफ्फी’त यंदा नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) आणि पदार्पणातील सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमा हे दोन्ही पुरस्कार मराठी कलाकृतींना मिळाल्याने ‘इफ्फी’मध्ये मराठीची पताका उंचावली आहे.
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमा या विभागात नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित ‘घरत गणपती ’ या चित्रपटाला पुरस्कार प्राप्त झाला. चित्रपटाला 5 लाखांचे रोख बक्षीस मिळाले. या श्रेणीमध्ये बूंग, घरत गणपती, मिक्का बन्नाडा हक्की, राझकार, थनुप्प या 5 सिनेमांची चुरस होती. मात्र, पहिल्यांदाच ‘इफ्फी’मध्ये सुरू केलेल्या या विभागात मराठी सिनेमाने बाजी मारून घवघवीत यश संपादन केले. तर सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कारावर चिन्मय केळकर आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘लंपन ’ या वेब सिरीजने नाव कोरले. विजेत्या सिरिजला 10 लाखांचे रोख बक्षीस देण्यात आले. यामध्ये एकूण 10 वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेब सिरीजचा समावेश होता. प्रकाश नारायण संत यांच्या कथानकावर आधारीत वेब सिरिजने प्रेक्षकांची मने जिंकल्यानेच हा बहुमान मिळाला.