परळी मार्गावर वारंवार एस.टी.च्या भंगार बसेस पाठवल्या जात असून प्रवाशांना नाहक फटका बसत आहे.Pudhari Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:21 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:21 am
परळी : परळी खोर्यातील अनेक गावांमधून नादुरुस्त तसेच फुटक्या काचेच्या, अनेक ठिकाणी पत्रा तुटलेल्या बसेस पाठवल्या जात आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांमधून एसटी महामंडळाच्या या अजब कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
परळी खोर्यातील जनजीवन एस.टीवर अवलंबून आहे. मात्र अनेक गावांमधून एस.टी. बसेस नादुरुस्त होऊन बंद पडण्याच्या घटना घडत असतात. एक गाडी बंद पडली तर त्याच्या पुढील एसटी फेर्या अचानकच रद्द केल्यामुळे प्रवाशांना व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परळी मार्गावरील केळवली, चाळकेवाडी, जांभे, अलवडी, पाटेघर, करंजे तर्फ परळी, लावंघर या मार्गावर नेहमीच कुठे ना कुठेतरी गाडी बंद पडलेली असते. एस टी महामंडळाच्या या अजब कारभाराचा प्रवाशांना सातत्याने सामना करावा लागत आहे. यामुळे या मार्गावरील एसटी फेर्या वेळेत सोडाव्यात तसेच चांगल्या सुसज्ज गाड्या पाठवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.