पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद मिटेना:अदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास गोगावलेंचा विरोध
2 hours ago
1
पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमधील वाद ९६ तासांनंतरही कायम आहे. अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याने शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले नाराज झाले आहेत. अदितींना जिंकून आणले नसते तर हा वाद उद्भवलाच नसता असे वक्तव्य गोगावले यांनी केले आहे. त्यावर तटकरे म्हणाल्या की, अशा प्रकारचे वक्तव्य करणे आश्चर्यजनक आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवली आहे. इच्छा व्यक्त करणे वाईट नाही, पण ती व्यक्त करताना कसे करतो हेही महत्त्वाचे आहे असा टोलाही त्यांनी मंत्री भरत गोगावले यांना लगावला. तत्पूर्वी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आम्ही सुसंस्कृत आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना गोगावले म्हणाले की एक दिवस आम्ही त्यांच्या (तटकरेंच्या) सुसंस्कृतपणाचा पाढा वाचू. तुमच्या सुसंस्कृतपणाचा एक दिवस पाढा वाचू एकनाथ शिंदे जे ठरवतील आणि देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला अजूनही मान्य असेल. हिंदुत्व हे आमचे रक्त आहे. ते आम्ही कुठेही ढळू देणार नाहीत हे लक्षात ठेवावे, असा इशारा गोगावलेंनी नाव न घेता तटकरे यांना दिला. सुनील तटकरे आमच्यामुळे खासदार आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्हालाही तारतम्य आहे. पण जे सुसंस्कृतपणाचं बोलले त्यांनी आधी हे पाहावे की आपण तीन आमदारांना जिंकून आणण्यासाठी की पाडण्यासाठी प्रयत्न केले? सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचं रान करत काम केले. लोकसभेला महाराष्ट्रात अजित पवार गटाची रायगड ही एकमेव जागा शिंदेसेना आणि भाजपमुळे निवडून आली हे कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र, मी पालकमंत्रिपदावर दावा करेन म्हणून तटकरेंनी विधानसभेत मला मदत केली नाही. भाजपच्या लोकांनी माझे काम केले, असे गोगावलेंनी स्पष्ट केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)