पीसीओएस आणि लठ्ठपणा

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Oct 2024, 12:01 am

Updated on

17 Oct 2024, 12:01 am

पीसीओएस म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. संप्रेरकातील असंतुलन. पीसीओएस या समस्येमुळे स्त्रीबीज तयार होत नाहीत. पाळी नियमित येत नाही. चेहर्‍यावर मुरूम, पुटकुळ्या, फोड येतात. चेहर्‍यावरील केस वाढतात. लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास, अनुवंशिकता, इन्सुलिन प्रतिरोधक घटकांमुळे ही समस्या उद्भवते.

चेहर्‍यावर आणि शरीरावर नको असलेले केस, पुरळ, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, त्वचेवर काळे डाग पडणे, वंध्यत्व, केस गळणे अशी लक्षणे पीसीओएसमध्ये आढळून येतात. पीसीओएसमुळे अंडाशयामध्ये सूक्ष्म द्रवाने युक्त पिशव्या (ज्याला गाठी किंवा ग्रंथी म्हणतात) निर्माण होऊ शकतात; मात्र त्या बर्‍याचदा पूर्णपणे विकसित होऊ शकत नाहीत आणि त्यातून अंडी स्रवली जात नाहीत. ज्यातून पुढे अविकसित गाठींची जास्त उत्पत्ती होऊ शकते.

पीसीओएसमधील हार्मोनल असंतुलन आणि इन्सुलिनचा प्रतिकार यामुळे वजन कमी करणे अधिक कठीण होते, तर जास्त वजन पीसीओएसची लक्षणे वाढवते. लठ्ठपणामुळे पीसीओएसशी संबंधित इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो, जसे की टाईप 2 मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब. तरीही लठ्ठपणा हे पीसीओएसचे एकमेव कारण नाही. त्यासाठी पीसीओएस आणि लठ्ठपणा याबाबत असलेले गैरसमज दूर करणे आणि जागरूकता व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसिज (पीसीओडी) आणि लठ्ठपणा याबाबत असलेले समज व गैरसमज खालीलप्रमाणेआहेत.

1. गैरसमज : पीसीओडीसाठी लठ्ठपणा हे एकमेव कारण आहे.

वास्तव : पीसीओडीसाठी लठ्ठपणा हा एक जोखीम घटक असला तरी, हे एकमेव कारण ठरत नाही. पीसीओडीही सामान्य वजनाच्या स्त्रियांनादेखील प्रभावित करू शकते. पीसीओडीच्या विकासामध्ये अनुवंशिकता, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि हार्मोनल असंतुलन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

2. गैरसमज : पीसीओडी असलेल्या सर्व महिलांचे वजन वाढते

वास्तव : पीसीओडी असलेल्या महिला लठ्ठ असतीलच असे नाही. सामान्य किंवा कमी बीएमआय असलेल्या अनेक स्त्रियांना ही समस्या असू शकते. लठ्ठपणामुळे लक्षणे आणखी बिघडू शकतात; परंतु सामान्य वजनाच्या स्त्रियांमध्येही पीसीओडीची लक्षणे दिसून येतात.

3. गैरसमज : वजन कमी झाल्यास पीसीओडी बरा होईल.

वास्तव : वजन कमी केल्याने लक्षणे कमी होण्यास मदत होते; परंतु ते पीसीओडी हा आजार बरा करू शकत नाही. जीवनशैलीतील बदल हे त्याची लक्षणे नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

4. गैरसमज : पीसीओडीमध्ये वजन हे फक्त जास्त खाण्याने वाढते.

वास्तव : पीसीओडी असलेल्या महिलांना अनेकदा इन्सुलिनच्या प्रतिकाराचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वजन कमी करणे आव्हानात्मक होते आणि निरोगी आहारानेही वजन वाढू शकते. हार्मोनल असंतुलनदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, जे जास्त न खातादेखील वजन वाढवते.

5. गैरसमज : पीसीओडी असलेल्या महिला सहज वजन कमी करू शकतात.

वास्तव : इन्सुलिन प्रतिरोध आणि हार्मोनल समस्यांमुळे पीसीओडी असलेल्या स्त्रियांसाठी वजन कमी करणे इतरांपेक्षा जास्त आव्हानात्मक असते. त्यांचे वजन नियंत्रित करण्यासाठी त्यांना विशिष्ट आहार योजना आणि व्यायामासारख्या उपचारांची आवश्यकता भासते. लठ्ठपणाशी संबंधित प्रकरणांमध्ये रोगाच्या टप्प्यावर अवलंबून औषधे, एंडोस्कोपिक पर्याय किंवा बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यासारखे वजन कमी करण्याच्या पर्यायांचा विचार केला जातो.

6. गैरसमज : लठ्ठपणा आणि पीसीओडी हे केवळ प्रजननच्या आरोग्य समस्यांशी जोडलेले आहेत.

वास्तव : लठ्ठपणा आणि पीसीओडीमुळे टाईप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या चयापचय स्थितींचा धोका देखील वाढतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article