कोल्हापूर ः दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबमार्फत महिलांसाठी दरवर्षी सवलतीच्या दरात विविध लहान आणि मोठ्या सहलींचे आयोजन केले जाते. 2023 ला केरळ, 2024 मध्ये काश्मीर सहलींच्या यशस्वितेनंतर आता परदेशात कस्तुरी क्लबने सर्व महिलांसाठी दुबई सहलीचे आयोजन केले आहे.
दरवर्षीप्रमाणे दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबने आणली आहे लेडीज स्पेशल आंतरराष्ट्रीय दुबईसह अबुधाबी सहल. पुढारी कस्तुरी क्लब व अ हेवन हॉलिडे यांच्या संयुक्त विद्यमाने सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिलला ही सहल निघणार आहे. सहल सात दिवसांची असून चार रात्री पाच दिवस दुबई येथे व उर्वरित दोन दिवस कोल्हापूर ते मुंबई ते कोल्हापूर असे प्रवासाचे नियोजन असणार आहे.
सहलीमध्ये असणार्या समाविष्ट बाबी : कोल्हापूर ते कोल्हापूर ट्रान्स्फर विमान तिकीट, व्हिसा, ब—ेकफास्ट लंच डीनर, भारतीय पद्धतीचे जेवण, फोर स्टार हॉटेल, सर्व साईट सीन एसी कोचने प्रवास. मराठी किंवा हिंदी मॅनेजर विथ गाईड, पासपोर्ट काढून देण्याची व्यवस्था केली आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत या रकमेची 30 टक्के रक्कम भरून आपली सहल बुकिंग करू शकता. सहलीचा लाभ स्त्रियांनी घ्यावा आणि दुबईचा अविस्मरणीय आनंद लुटावा. यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - 9923617769, 7498731912, 9423824997.
दुबई ट्रीपसाठी कर्ज योजना उपलब्ध आहे. 20 हजार रुपये डाऊन पेमेंट भरून तीन वर्षे हप्ता योजना आहे. ज्यांना लोन करायचे आहे त्यांनी कस्तुरी कार्यालयाशी संपर्क साधावा.
दुबई सिटी टूर, जुनी दुबई आणि नवी दुबई, धाऊ क्रूज डीनर, बुर्ज खलिफा 124 व्या मजल्याचे तिकीट, बुर्ज खलिफा लेसर शो, दुबई मॉल, दुबई फाऊंटन शो, बुर्ज अल अरब जो मेरा बीच, फ्युचर म्युझियम फोटो स्टॉप, दुबई प्रेम फोटो स्टॉप, डेझर्ट सफारी विथ बेली डान्स, मीना बाजार, ग्लोबल विलेज, मिरॅकल गार्डन, अबुधाबी सिटी, खजूर मार्केट, हिंदू मंदिर, फेरारी वर्ल्ड पार्क फोटो स्टाफ, ग्रँड मस्क.