बहुमत असताना मुख्यमंत्रिपद लटकून का ठेवले?:निकाल जनतेचा कौल नाही; शिंदेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही- संजय राऊत
21 hours ago
2
230 जागा जिंकलेल्या महायुतीचा अजून मुख्यमंत्री ठरत नाही. भाजपला 132 जागा म्हणजे पूर्ण बहुमत असताना राज्याचे मुख्यमंत्रीपद का लटकून पडले आहे? हे जनतेला कळत नाही, लोकांना त्यात रसदेखील नाही, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीला लगावला आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात जो निकाल लागला आहे तो जनतेचा कौल नाही. 3 पक्षांना बहुमत असताना विधानसभेची मुदत संपून राज्याला सरकार मिळत नाही. आमचे सरकार येणार असते तर राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवले असते, असे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षासाठी कायदे नियम असतात. महायुतीला कोणताही नियम नाही. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा कसा असू शकतो यावर मी आता बोलणार नाही. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार हे दिल्लीतील मोदी, शहांना दिले असतील तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये. निवडणूक आयोग, मोदी-शहांनी तुमच्या हाती जी शिवसेना दिली आहे, तिचे निर्णय घेण्याचे अधिकार जर तुम्हाला नसतील तर तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान असे शब्द काढू नये. मविआतून बाहेर पडणार नाही संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही. आमच्या तिन्ही पक्षांना धक्का बसला आहे. याची कारणं पाहिले तर ते EVM आणि वाटलेले पैसे याकडे जात आहे. तिन्ही पक्ष मिळून आम्ही यावर चर्चा करत आहोत. काही कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपण एकटे लडायला पाहिजे असते. पण मुंबईसह 14 मनपाच्या निर्णय घ्यावा लागतो. लोकसभा-विधानसभेच्या 5 वर्षांनी निवडणुका आहे. त्यामुळे आत इतक्या घाईने निर्णय घेत नसतात. पराभूत उमेदवारांचे हे मत आहे, जे जिंकले त्यांचे हे मत नाही, त्यामुळे ह्या बातम्यांना आधार नाही, असे राऊतांनी स्पष्ट केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)