बांगला देशी महिलांना आज न्यायालयात हजर करणारfile photo
Published on
:
23 Jan 2025, 1:15 am
Updated on
:
23 Jan 2025, 1:15 am
कणकवली ः कणकवलीत अटक करण्यात आलेल्या बांगला देशी महिला साथी अतुल माझी (32) आणि लिझा रहिम शेख (28) या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवार 23 जानेवारी रोजी संपत आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या पोलिस कोठडीच्या कालावधीत पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली. दरम्यान याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार सह आरोपी करण्यात आलेला लक्ष्मी लॉजचा मालक अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
बांगला देशी महिला प्रकरणाला वेश्या व्यवसायासंबंधी वळण लागल्यानंतर या गुन्ह्याच्या कलमामध्ये पिठा कायद्यांतर्गत वाढ करण्यात आली आहे. या महिलांना कणकवलीत बोलविल्याप्रकरणी लक्ष्मी लॉजचा मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल असून सध्या मॅनेजर पोलिस कोठडीत आहे. मात्र, अद्यापही लॉज मालक पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या मागावर पोलिस आहेत. तर महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून त्याबाबतचा युक्तीवाद न्यायालयात केला जाणार आहे.