बोर्ड सर्टिफिकेटवर जन्मस्थळ अफगाण, तरीही अकोल्यात दोघांना मतदान कार्ड:बनवेगिरीचे पुरावे प्रतिनिधीच्या हाती, अमजद व परवीन यांचे 2001 पासून अकोल्यात वास्तव्य

2 hours ago 1
शालांत परीक्षा प्रमाणपत्रावर जन्मस्थळ म्हणून अफगाणिस्तानमधील पक्तिया झुरमत असा उल्लेख असल्यानंतरही अकोला पश्चिम मतदारसंघाच्या मतदार यादीत नावाची नाेंद झाली. त्यानंतर शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत व रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयकाच्या आधारे अफगाणिस्तानातील दाेन नागरिकांनी भारतीय निवडणूक आयाेगाकडून मतदान कार्ड मिळवले. दिव्य मराठीने यात इन्व्हेस्टिगेशन केले. ज्या प्रमाणपत्राच्या आधारे मतदान कार्ड काढले, ते प्रमाणपत्रही मिळवले. शपथपत्रावर जन्मस्थळ अकाेला असल्याचा उल्लेख व घरमालकाचे इलेक्ट्रिक बिल हे पुरावे निवडणूक आयाेगाकडून विहित करण्यात आलेल्या पुराव्यांपैकी हाेते, असा दावा आता निवडणूक विभागाकडून करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. आता या व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचेही पुढे आले आहे. याप्रकरणी रामदास पेठ पाेलिस ठाण्यात अफगाण नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम कलम ३१८ (४), ३३६ (३), ३३७, ३३९, ३ (५), सह कलम १३( १) व विदेशी व्यक्ति अधिनियम १९४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. मात्र अफगाण नागरिक दिशाभूल, खाेटी पुरावे सादर करीत असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात का आले नाही, असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे. एक वर्षांपूर्वी केला अर्ज अफगाणी नागरिकांनी जानेवारी २०२४ मध्ये ऑनलाइन पद्धतीने मतदार नाेंदणीसाठी अर्ज केला. या फाॅर्मसाेबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्राची प्रत व रहिवासी पुरावा म्हणून महावितरण कंपनीच्या वीज देयकाची प्रत जाेडली होती. केदार मंदार अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे दाखवले. ते भाड्याने राहत हाेते. गुन्हा दाखल केला दोन अफगाण्यांनी मतदान ओळखपत्र प्राप्त करून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची प्रशासकीय कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. - अजित कुंभार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अकाेला. व्हिसासाठी अर्ज केला अन् बिंग फुटले दोन्ही अफगाणींनी दीर्घ मुदतवाढ व्हिसा मंजुरीसाठी अर्ज केला. दरम्यान, त्यांना पाेलिस अधीक्षक कार्यालयात बाेलावले हाेते. कागदपत्रे पडताळणीत त्यांच्याकडे भारतीय निवडणूक आयाेगाचे मतदान कार्ड असल्याचे उघड झाले. अफगाण नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान हे सन २००१ पासून अकाेल्यात वास्तव्यास हाेते. त्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी जाेडलेल्या दस्तऐवजात हा उल्लेख असून स्वत:चे जन्मस्थळ अकाेला असल्याचे शपथपत्रात नमूद केले. कागदपत्रांची पडताळणी जिल्हा निवडणूक विभागाने करणे आवश्यक होते. हे न केल्यानेच त्यांना मतदान कार्ड देण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article