प्रयागराज मध्ये महा कुंभमेळा सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून साधू संत या महा कुंभात पोहोचले आहे. महा कुंभारतही भाविकांची सातत्याने गर्दी होत आहे. मकर संक्रांतीचे पहिले शाही स्नान महा कुंभात झाले. आता महा कुंभातील दुसरे शाही स्नान मौनी अमावस्येला केले जाणार आहे. मौनी अमावस्येचे शाही स्नान 29 जानेवारीला होणार आहे. पण या स्नानापेक्षा महा कुंभातील शेवटचे शाही स्नान महत्त्वाचे मानले जात आहे.
शेवटच्या शाही स्नान महत्त्वाचे
महा कुंभा मधील शेवटचे शाही स्नान अत्यंत विशेष मानले जात आहे. महा कुंभातील शेवटच्या शाही स्नानाला अनेक शुभ योग तयार होणार आहेत. महा कुंभातील शेवटचे शाही स्नान महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी महाशिवरात्र कधी आहे आहे ते जाणून घेऊ तसेच या दिवशी कोणते शुभ तयार होणार आहेत ते जाणून घेऊ.
कधी आहे महाशिवरात्र?
यावर्षी महाशिवरात्र 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 :08 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 फेब्रुवारीला 8:54 मिनिटांनी संपेल. यानुसार यावर्षी महाशिवरात्र 26 फेब्रुवारीला केली जाणार आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशीच महाकुंभ मेळाव्याचे शेवटचे शाही स्नान होणार आहे. शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग असे दुर्मिळ योग महाशिवरात्रीला घडणार आहेत. या योगांमध्ये महा कुंभ मेळाव्याचे शेवटचे शाही स्नान केले जाईल.
शुभ योगांचे महत्त्व
शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग हे अतिशय शुभ आहेत. मान्यतेनुसार शिव योगामध्ये केलेले कार्य शुभ आणि फलदायी असते. शिव योगामध्ये तीर्थयात्रा, स्नान आणि दान करणे पुण्यकारक ठरते. शिव योगामध्ये तीर्थयात्रा आणि दान केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग सर्व मनोकामना पूर्ण करणारा योग मानला जातो. सर्वार्थ सिद्धी योगात गंगा स्नान आणि संगमाची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते. रवी योग शुभकार्य यशस्वी करणारा मानला जातो. या योगामध्ये संगम स्नान केल्याने सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)