मुंडेंनी सरकारी कंत्राट लाटल्याची तक्रार; आमदारकीही धोक्यात:सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा दावा
2 hours ago
1
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही जाणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. यासाठी त्यांनी मुंडेंकडील एका कथित लाभाच्या पदाचा दाखला दिला आहे. दमानिया यांनी बुधवारी देशमुख हत्याकांडप्रकरणी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. त्या म्हणाल्या, राज्य शासनाच्या महाजेनको कंपनीकडून धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या कंपनीला एक कंत्राट देण्यात आले होते. या माध्यमातून मुंडे यांनी आपल्या कंपनीचा थेट फायदा करून घेतला. हे लोकप्रतिनिधींसाठी घालून देण्यात आलेल्या ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नियमाचे स्पष्ट उल्लंघन आहे. त्यामुळे मुंडे यांचे मंत्रिपद सोडा, त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते. वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना आर्थर रोड तुरुंगात पाठवा वाल्मीक कराडला एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी मिळालीच कशी? असा सवालही दमानियांनी केला. त्या म्हणाल्या की, एक आरोपी विष्णू चाटेला लातूरच्या तुरुंगात हलवण्यात आले आहे. तेथे त्याच्या जवळचे ८-१० लोक आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत हा खटला मुंबईत हलवावा. वाल्मीक व इतर आरोपींना आर्थर रोड तुरुंगात पाठवावे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)