‘या’ कारणांमुळे बिघडते आतड्यांचे आरोग्यPudhari File Photo
Published on
:
31 Jan 2025, 11:54 pm
Updated on
:
31 Jan 2025, 11:54 pm
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाची प्रणाली असलेल्या आपल्या आतड्यांच्या आरोग्याकडे बहुतेकदा आपले दुर्लक्ष होत असते. आतड्यांचे आरोग्य बिघडल्याने पचनाच्या समस्या, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि इतर अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया, कोणत्या खाण्या-पिण्याच्या सवयी आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवतात.
जंक फूडचे सेवन : जंक फूडमध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ, ट्रान्स फॅटस्, साखर आणि मीठ जास्त प्रमाणात असते. ते आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया नष्ट करते आणि पचन मंदावते.
जास्त प्रमाणात मद्यपान : अल्कोहोलच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते, चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि यकृताचेही नुकसान होते.
जास्त प्रमाणात गोड पेये घेणे : गोड पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि वजन वाढते.
जास्त ताण : ताणतणावामुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि पचनक्रियेवर परिणाम होतो.
नियमित नाश्ता न करणे : नाश्ता न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते आणि पचन प्रक्रिया मंदावते.
जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन : कॅफिनमुळे आतड्यांमध्ये आम्लता वाढते, ज्यामुळे अपचन आणि पोटदुखी होऊ शकते.
पुरेसे पाणी न पिणे : आतडे निरोगी ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पुरेसे पाणी न पिल्याने बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
प्रक्रिया केलेल्या अन्नाचे जास्त सेवन : प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये मीठ, साखर आणि संरक्षक घटकांचे प्रमाण जास्त असते, जे आतड्यांसाठी हानिकारक असतात.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे?
फायबरयुक्त आहार घ्या : फायबरयुक्त आहार आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतो आणि पचन सुधारतो.
प्रोबायोटिक्स समृद्ध असलेले पदार्थ खा : प्रोबायोटिक्स हे चांगले बॅक्टेरिया आहेत, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
पुरेशी झोप घ्या : आतड्यांच्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे.
ताण कमी करा : योग, ध्यान आणि व्यायाम ताण कमी करण्यास मदत करतात.
नियमित व्यायाम करा : व्यायामामुळे पचन सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.