Published on
:
31 Jan 2025, 11:42 pm
Updated on
:
31 Jan 2025, 11:42 pm
लंडन : या जगात कोणत्या वस्तूला अव्वाच्या सव्वा किंमत मिळेल हे काही सांगता येत नाही. कचर्यात राहणार्या एखाद्या किड्याला इतकी किंमत मिळू शकते की त्या पैशात आपण बीएमडब्ल्यू किंवा ऑडीसारख्या आलिशान मोटारीही खरेदी करू, असे तुम्हाला कधी वाटले होते का? मात्र, जगाच्या पाठीवर असा एक किडा आहे, ज्याची ओळखच ‘जगातील सर्वात महागडा किडा’ अशी आहे. या किड्याची किंमत आहे 75 लाख रुपये!
या किड्याचे नाव आहे स्टॅग बीटल. त्याचा आकार फक्त दोन ते तीन इंच इतका असतो. त्याचे वैज्ञानिक नाव ‘लुकानस सर्व्हस’ असे आहे. या किड्याला इतकी किंमत मिळण्याचे कारण म्हणजे तो भाग्यवर्धक आहे असे परदेशात मानले जाते. हा किडा जवळ ठेवल्यास भाग्य उघडते असे अनेक ‘विकसित’ देशांमधील लोकांना वाटते. या किड्याचे वजन दोन ते सहा ग्रॅम असते. त्याचे सरासरी आयुष्य तीन ते सात वर्षे असते. स्टॅग बीटलचे नर 35 ते 75 मिमी लांब असतात तर मादी 30 ते 50 मिमी लांबीच्या असतात. या किड्यांचा वापर वैद्यकीय कारणासाठीही केला जातो. स्टॅग बीटल हे झाडांचा रस किंवा कुजलेल्या फळांचा रस यांचे सेवन करतात. त्यांच्या अळ्या कुजलेले लाकूड खाऊन मोठ्या होतात. त्यांचे जबडे तीक्ष्ण असतात. त्याच्या साहाय्याने ते तंतुमय पृष्ठभागावरून तुकडे खरवडून खातात.