बिटकॉईन घोटाळ्यात एसआयटीकडून चौकशी होणार.Pudhari File Photo
Published on
:
07 Feb 2025, 1:18 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:18 am
बंगळूर : राज्यातील राजकारणात खळबळ माजवणार्या बिटकॉईन घोटाळ्यात युवा काँग्रेस अध्यक्ष मोहम्मद नलपाड हॅरीस अडचणीत आले आहेत. विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांना नोटीस बजावली असून, त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासाकडे धाव घेतली आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित श्रीकृष्ण ऊर्फ श्रीकी याच्याशी नलपाड यांचे व्यावहारिक संबंध होते, असे विशेष तपास पथकाला (एसआयटी) आढळून आले आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी एसआयटीने सीआयडी कार्यालयात नलपाड यांची चौकशी केली होती. त्यानुसार या प्रकरणात एसआयटीने त्यांना नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यानंतर नलपाड यांनी आपले राजकीय गुरू उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या निवासाकडे धाव घेतली. तसेच या प्रकरणातून बाहेर पडण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. याविषयी गृहमंत्री डॉ. परमेश्वर म्हणाले, एसआयटी नोटिस हा चौकशीचा भाग आहे. अधिकार्यांना हवी ती माहिती ते घेत आहेत.