राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार:शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांचा दावा; CM पदावरून नाना पटोले यांना टोला

4 hours ago 1
एक्झिट पोलचे अंदाज काहीही असले तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेला सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची मुजोरी आवडलेली नाही. त्यामुळे मविआचे 160 हून अधिक आमदार निवडून येतील, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर जारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये सत्ताधारी महायुतीला अनुकूल वातावरण असल्याचा दावा करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी त्यावर भाष्य करताना राज्यात कोणत्याही स्थितीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. जनतेला अनेक गोष्टी आवडल्या नाहीत ते म्हणाले, जनतेला महायुती सरकारच्या नेत्यांना आलेली मुजोरी आवडलेली नाही. वहिणींना बारामतीत थांबवणे, दाराबाहेर उभे करणे, अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांचे डोके फोडणे, जागोजागी पैसे वाटणे, विनोद तावडेंसारख्या मोठ्या नेत्यांजवळ 5 कोटी मिळणे यासारख्या गोष्टी जनेतला आवडणाऱ्या नाहीत. शरद पवारांनी अवघी बारामती घडवली. पण त्यांच्याच पत्नीला दाराबाहेर मॉलच्या थांबवण्यात आले. त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. हे कोणत्या कायद्यात बसते? आता माणुसकीचा लवलेश नसणारी माणसे राजकारणात आली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व भागातील आमदार निवडून येतील. त्यांची संख्या 160 च्या वर असेल. नाना पटोले यांच्यावर साधला निशाणा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. प्रत्येकाला आपण मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. सर्वांना तशी हौस असते. असे बोलल्याने 5 मिनिटांचा आनंद मिळतो. काही जण त्याचा आनंद घेतात. मी मुख्यमंत्री होणार असे म्हटल्याने मलाही आनंद मिळतो, असे ते उपरोधिकपणे नाना पटोले यांना टोला हाणताना म्हणाले. एकनाथ शिंदे काय होणार? देवेंद्र फडणवीस काय होणार? याच्याशी आम्हाला कोणतेही देणेघेणे नाही. आमच्या मुख्यमंत्री होत असताना आम्ही त्यांचा पाहण्यास कशाला जावे? राज्यात सत्ता परिवर्तन होणार असून, महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा... एकनाथ शिंदे - शरद पवार एकत्र येणार?:संजय शिरसाट म्हणाले - शिंदे नेहमीच योग्य दिशेने जातात, आम्ही त्यांचा शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ मुंबई - विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मतदान यंत्रामध्ये बंद झाल्यानंतर आता राज्यात कुणाची सत्ता येणार? याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संभाव्य युतीचे संकेत दिलेत. यामुळे निवडणूक निकालानंतर राज्याच्या राजरकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article