Published on
:
07 Feb 2025, 4:42 am
Updated on
:
07 Feb 2025, 4:42 am
नागपूर : एका गुन्हातून आरोपी म्हणून नाव काढणे तसेच जप्त केलेला मोबाईल परत देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आणि 30 हजारांत तडजोड करीत ती स्वीकारणाऱ्या महिला पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ज्योत्सना प्रभू गिरी, वय 34 वर्ष, पोलीस उप निरीक्षक, पोलीस ठाणे एमआयडीसी बुटीबोरी असे आरोपीचे नाव आहे.
सदर उपनिरीक्षक गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख असल्याने चोरीच्या गुन्हयात आरोपी न करणे व तक्रारदार यांचा मोबाईल परत देण्याकरिता 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत,प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार दिली व ही कारवाई करण्यात आली.