Published on
:
18 Jan 2025, 12:54 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:54 am
न्यू जर्सी : अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एका शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असून, संबंधित शिक्षिकेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शाळेतील शिक्षिका लॉरा कॅरॉन 13 वर्षांच्या विद्यार्थ्यापासून गर्भवती राहिली आणि नंतर तिला एक मुलगाही झाला. विशेष म्हणजे, विद्यार्थी अकरा वर्षांचा असल्यापासून आरोपी शिक्षिका त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. केप मे काऊंटी न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी आणि शिक्षिका 2016 ते 2020 दरम्यान शिक्षिकेच्या घरी एकत्र राहात होते आणि त्या काळात त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले होते. पीडित विद्यार्थी पाचवीत असताना आरोपी त्याची वर्गशिक्षिका होती. 2005 मध्ये जन्मलेला पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांचे शिक्षिकेशी जवळचे संबंध होते. त्यामुळे पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याला शिक्षिकेच्या घरी काही दिवस राहण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर 2016 मध्ये पीडित विद्यार्थी तिथे कायमस्वरूपी राहायला गेला होता. विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप न्यायालयाने शिक्षिकेवर ठेवला आहे.