विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा नव्हती:अत्यंत दुर्दैवी घटना.. स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न, मविआच्या नेत्यांकडून टीका
5 days ago
1
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे हे 5 कोटी रुपये वाटत असताना सापडल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील विनोद तावडे आणि भाजप महायुतीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस विकला जाणार नाही, असे जयंत पाटील म्हणालेत स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न - जयंत पाटील
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले आहे की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही. ही जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची जनता आहे. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसने पैसे वाटणे अत्यंत दुर्दैवी - अंबादास दानवे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विधानसभा निवडणुकीत पैसे वाटावे लागणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाराष्ट्राची अशी संस्कृती नाही. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने पैसे वाटले असते तर ठीक मात्र पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि असे पैसे वाटणे म्हणजे अत्यंत दुर्दैव असल्याची, भावना दानवे यांनी व्यक्त केली. विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती - सुप्रिया सुळे
याच प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यांच्याकडे पैसे येतात कुठून? नोटबंदी भाजपाच्या सरकारने केली. मग एवढ्या नोटा येतात कुठून? एकीकडे नोटबंदी करता मग चलनात एवढी रोख रक्कम येते कुठून? विनोद तावडेंवर हा आरोप होतोय ही अतिशय धक्कादायक बाब आहे. भाजपाच्या ओरिजिनिल लोकांकडून अशी कृती कधीच होणार नाही. ही अस्वस्थ करणारी कृती असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपाकडे 5 कोटीपर्यंतची रोख रक्कम आली कोठून? या पैशांची मुव्हमेट कशी केली? भारतातील नागरीक न्याय मागत आहेत. हे चुकीचे आहे. घाणेरड्या आणि गलिच्छ कृतीचा जाहीर निषेध करते. भाजप घाबरत आहे. सरकार येत नाही असे त्यांना दिसत आहे. पण अशी अपेक्षा भाजपकडून नव्हती. विनोद तावडेंकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. त्यांच्याबाबत अशी बातमी येणे, दु:ख देणारे. विनोदजी मला धक्का बसलाय की भाजपा असं काही करू शकेल.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)