कोल्हापूर : महावितरण कंपनीने बालिंगा सबस्टेशनच्या 33 के.व्ही. मुख्य वीजवाहिनीच्या मासिक देखभाल- दुरुस्तीचे काम सोमवारी (दि. 20) हाती घेतल्याने बालिंगा योजनेतून पाणी उपसा होणार नाही. परिणामी सोमवारी पाणीपुरवठा बंद राहील. 21 जानेवारीला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा मात्र सुरू राहणार आहे.
यामध्ये ए, बी वॉड व त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरांतर्गत येणार्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत, राजेसंभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंब्ये रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग. संपूर्ण सी, डी वॉर्ड, दुधाळी, गंगावेस, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब—ह्मपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब व त्यास संलग्नित ग्रामीण भाग व उपनगरे तसेच ई वॉर्डअंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5, 6, 7 व 8 वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागात पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा मात्र या दिवशी सुरू राहणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत बालिंगा उपकेंद्राचे वीजवाहिनीचे काम संपताच तेथील पाणी उपसा सुरू होऊन शहराला पाणीपुरवठा सुरू होणार आहे.