सत्ता नसल्याने त्यांच्यावरही परिणाम झाला:अजित पवार यांची महाविकास आघाडीवर टीका
6 days ago
2
लाडकी बहीण सुरू करताना सगळा विचार करून बजेट आणले आणि योजना दिली. तुमच्या काळात सव्वा रुपयाही कोणाला दिला नाही आणि आम्हाला दीड हजाराच्या गप्पा हाणता, विरोधी लोक ही योजना बंद करायला कोर्टात गेले, बरेच दिवस सत्ता नसल्याने त्यांच्यावरही परिणाम झाला आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. प्रारंभी चारूदत्त सिनगर, विजय वहाडणे, रवींद्र बोरावके, महेमुद सय्यद यांची भाषणे झाली. व्यासपीठावर चैताली काळे, कपिल पवार, राजेश परजणे, अशोक रोहमारे, नितीन औताडे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळवण्याची योजना साकारण्याचे काम येड्यागबाळ्याचे नाही. त्यासाठी मोठा निधी लागतो. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. पुढील साडेचार वर्षे तेच पंतप्रधानराहणार आहेत. त्यांच्या विचारांचेचसरकार महाराष्ट्रात आल्यास निधी मिळूशकतो. त्याचा फायदा आपण करूनघेतला पाहिजे. तुम्ही तरूण, उच्चशिक्षितव चांगले व्हिजन असलेला आमदारआशुतोषच्या रूपाने दिला आहे.विधिमंडळातदेखील त्याने धडाडीने कामकेले, त्याचा मला अभिमान वाटतो.आशुतोष काळे याने स्वत:साठी कधीहीमागितलेले नाही. तो जो मागतो, तोसमाजासाठी, मतदारसंघाच्याविकासासाठी मागतो. त्याचे सर्व हट्ट मीपूर्ण केले आहेत. आता कोपरगावकरांनीत्यांना ८५ हजार मतांचे लिड द्यावे, त्याचेपुढचे सर्व हट्ट मी पूर्ण करतो. जेवढे जास्तलिड, तेवढा जास्त निधी आणि जबाबदारीमी आशुतोषला देईन. आमदार काळेम्हणाले, गेल्या पाच वर्षांत उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीनहजार कोटींचा निधी आणून अनेकविकास कामे केली. मतदार संघाचा चेहराबदलण्याचा प्रयत्न केला. त्याविकासकामांच्या जोरावर निवडणुकीलासामोरे जात आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांनी दिलेल्याशिकवणीप्रमाणेच निवडणुकीपुरतेराजकारण, त्यानंतर सर्वांना सोबत घेऊनजनतेची कामे करीत असतो. अजितपवार भाषणाला उभे राहाताच आताआशुतोष काळे यांना १ लाख मतानेनिवडून येतील,अशा घोषणा यावेळीदेण्यात आल्या. पवारांच्या सभेच्यामंचकावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे,बिपीन कोल्हे व विवेक कोल्हे यांचेकार्यकर्ते सक्रिय झाल्याचे दिसून आले.तसेच वंचित वंचित बहुजन आघाडीचेउमेदवार वसीम चोपदार यांनी आशुतोषकाळे यांना पाठिंबा दिला. चोपदार यांचासत्कार अजित पवार यांच्या हस्तेकरण्यात आला.
कोल्हे परिवाराचे धन्यवाद महायुतीत कोपरगावची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्याने, भाजपत असलेल्या कोल्हे परिवाराची राजकीय अडचण निर्माण झाली होती. भाजपच्या वरिष्ठ नेते व आम्ही विनंती केल्याने कोल्हे परिवाराने निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला, बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांना धन्यवाद देतो. भाजप त्यांचा योग्य सन्मान राखेलच, भाजपमधील अनेक वरिष्ठ नेते माझे मित्र आहेत. मीदेखील पाठपुरावा करून कोल्हे यांना योग्य संधी देण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)