सत्याचा शोध- आक्रोशाची कविता!

2 hours ago 2

>> चंद्रसेन टिळेकर

जगात ज्या देशांनी आपल्यासारखी स्त्राr शक्तीची नुसती तोंडदेखली ओवाळणी न करता त्यांच्या नैसर्गिक शक्तीचा उपयोग विविध क्षेत्रांत करून घेतला ते देश आज प्रगतिपथावर दमदार पावले टाकीत आहेत. आपल्या समाजाची, देशाची वाटचाल मात्र आता याच्या विरुद्ध सुरू झाली आहे. स्त्रियांवरील अत्याचार आता चिमुकल्या कळ्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. ही अधोगतीच नव्हे काय?

साधारणत तब्बल वीस वर्षांपूर्वी स्त्रियांवरील अत्याचारांसंदर्भात ‘उद्याच्या मातांनो’ शीर्षकांतर्गत एक कविता मी प्रसिद्ध केली होती, परंतु इतका मोठा कालावधी लोटून गेला तरी आपल्या समाजातील स्त्रियांवरील अत्त्याचार कमी तर झाले नाहीतच, उलट ते अत्याचार आता चिमुकल्या कळ्यांपर्यंत येऊन पोहोचलेत. बदलापूरसारख्या घटना आता अपवाद म्हणून नव्हे, तर नित्यनियमाच्या झाल्या आहेत हे त्या घटनेचे वृत्त वर्तमानपत्रांतून आल्यावरही पुन्हा असे संतापजनक प्रकार झाल्याचे आपण सर्वांनी वाचलेले असेलच. यासंबंधी आपल्या देशाच्या संदर्भात बोलायचे तर पुरुष जातीकडून स्त्रियांवर होणारे वाढते अत्याचार पाहून हिंदुस्थानी पुरुषत्वाला वाळवी तर लागली नाही ना, अशी शंका येते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्त्राrवर असा अत्याचार करणारा कधी त्या स्त्राrचा मित्र असतो, कधी गुरू असतो, तर कधी ती ज्याच्या मांडीवर लहानपणी खेळली, बागडलेली असते असा जवळचा आप्तही असतो.नेमके हेच विदारक वास्तव त्या कवितेत होते. त्यामुळे तिचे इथे स्मरण होणे अपरिहार्य आहे. अशी होती ती आक्रोश करणारी कविता…

इथे रोज एक,
द्रौपदी विवस्त्र केली जाते, अहिल्या कलंकित होते.
सीता वनवासी होते… त्याच्याकडून!
कधी तो सखा असतो, कधी तो गुरू असतो!
कधी तो पिताही असतो!
कुठे हरवला आहे कृष्ण?
तिच्या विवस्त्रतेवर वस्त्र टाकणारा!
कुठे असेल तो वाल्मीकी?
परित्यत्तेला आधार देणारा!
कुठे गवसेल अस्सल बीजाचा नर?
तिच्या स्त्राrत्वाचं रक्षण करणारा!
कधी अवतरेल रामशास्त्राr?
तिथल्या तिथे ‘देहांत’ गर्जणारा!
उद्याच्या मातांनो, आम्हाला माफ करा अन् अवसर द्या,
आम्ही शोधतोय ज्योतिबा,
आम्ही शोधतोय रघुनाथ धोंडीबा,
आम्ही शोधतोय धोंडो केशव!
तोवर उद्याच्या मातांनो,
आम्हाला अवसर द्या, आम्हाला अवसर द्या!!

या कवितेतले वास्तव अजूनही बदललं नाही, किंबहुना बदलत तर नाहीच, पण आधी म्हटल्याप्रमाणे ते दिवसेंदिवस राक्षसी स्वरूप धारण करतेय. आपला देश जगाच्या पाठीवर एक आध्यात्मिक देश म्हणून समजला जातो (पण तो नावाजला जातो की नाही हा एक प्रश्नच आहे) आणि आम्ही हे उठता बसता, संधी मिळेल तेव्हा जगाला ऐकवीत असतो, पण मग जगातल्या एकमेव देशात, जिथे कोटय़वधी देवदेवता वास करतात, सहस्त्रावधी साधुसंत आहेत आणि स्वतला संत-महंत, स्वामी, महाराज, बुवा, बापू अशा उपाध्या लावून आपल्याला सिद्धी प्राप्त झाली आहे असा शंख करणारे सिद्धपुरुष गावोगावी ठाण मांडून बसलेले असताना अशी अमंगल, अनैतिक अमानवी कृत्ये होतात तरी कशी, हे मात्र कुणी सांगत नाही. विविध विषयांच्या संदर्भात जागतिक अहवाल प्रसिद्ध होत असतात. त्या अहवालांमध्ये सार्वजनिक स्वच्छता, शिस्तप्रियता, लाचलुचपत, रस्त्यावरील अपघात याबाबतीत आपल्या देशाचा क्रमांक दुर्दैवाने वरचा तर लागतोच, परंतु स्त्रियांवरील अत्याचाराच्या बाबतीत तर आपण जगात अग्रेसर आहोत हे लाजिरवाणे सत्य या जागतिक सर्वेक्षणात नमूद केलेले असते ही किती शरमेची बाब आहे?

हे जरी सगळं खरं असलं तरी हेही खरे आहे, पुरुषप्रधान संस्कृती येण्यापूर्वी आधी अलिखितपणे का होईना, स्त्राrसत्ताक पद्धती अवलंबिली जात होती, असे उक्रांतीचे अभ्यासक सांगतात. आपल्या हिंदुस्थानात आजही केरळ व पूर्वेकडील काही राज्यांत ही संस्कृती पाहायला मिळते. पूर्वी स्त्राr हीच नवीन जीव निर्माण करू शकते हे पुरुषाने गृहीत धरले होते आणि त्यामुळे तो काहीसा तिला वचकूनही होता, परंतु पुढे शेतीचा शोध लागल्यावर नांगराने शेती नांगरून बी पेरल्याशिवाय नवीन पीक येत नाही हे त्याने जाणल्यावर आपलाही प्रजोत्पादनात वाटा आहे हे त्याच्या लक्षात आले आणि इथेच स्त्राrवर नाना तऱहेने कुरघोडी करण्याचे त्याचे सुरू झाले. निसर्गाने त्याला अनायासे स्त्राrपेक्षा दणकट शरीर दिले होते ते त्याच्या पथ्यावर तर पडलेच, परंतु तिला कमी लेखण्यासाठी तिच्या ऋतुमती होण्याचेही त्याने भांडवल केले. आजही या कारणास्तव स्त्राrला कमी लेखले जाते.

आजच्या काळाचा संदर्भ घेऊन बोलायचे तर स्त्राr अत्याचाराला अनेक घटक कारणीभूत असू शकतात, जसे मुलामुलींची कुटुंबातली जडणघडण, ढिसाळ शिक्षण व्यवस्था, प्रसार माध्यमे तरुणांत रुजवत असलेली अनैसर्गिक लैंगिकता आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये आलेली विकृत विफलता! या सर्व घटकांत कुटुंबामध्ये मुलाला मुलीच्या तुलनेत दिलेले झुकते माप हे नक्कीच घातक ठरते. तसेच याव्यतिरिक्त अधिक कोण गुन्हेगार असतील तर जगातील यच्चयावत धर्मग्रंथ! सर्व धर्मग्रंथांनी स्त्राrला दुय्यम दर्जाची ठरवली आहे. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या धर्माच्या नावे अफगाणिस्तानात स्त्रियांचा होत असलेला छळ.)

इथे एक नमूद करावेसे वाटते की, जगात ज्या देशांनी आपल्यासारखी स्त्राr शक्तीची नुसती तोंडदेखली ओवाळणी न करता त्यांच्या नैसर्गिक शक्तीचा उपयोग विविध क्षेत्रांत करून घेतला ते देश आज प्रगतिपथावर दमदार पावले टाकीत आहेत! आपण काय करायचं ठरवलंय?

[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article