दोडामार्ग : उपस्थित शेतकर्यांना हळद लागवडीविषयी मार्गदर्शन करताना आ. दिपक केसरकर सोबत इतर.pudhari photo
Published on
:
07 Feb 2025, 12:45 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:45 am
दोडामार्ग ः जिल्ह्यात हळद उत्पादन चांगल्या प्रकारे होते. विशेषतः दोडामार्ग तालुक्यात उत्तम दर्जाची हळद होते. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी ‘सिंधुरत्न’ योजनेच्या माध्यमातून हळद लागवड करावी, असे आवाहन सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आ.दीपक केसरकर यांनी केले.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व सिंधुरत्न योजना यांच्या विद्यमाने दोडामार्ग येथे व्यावसायिक हळद शेती मार्गदर्शन व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, केंद्र सरकार वाणिज्य व उद्योग मंत्रालय मंडळ सहा. संचालक डॉ. ममता धनकुटे, इसांते कंपनीचे संचालक डॉ. विक्रम मेहता, तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव,शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.
आ. केसरकर यांनी यावेळी ‘सिंधुरत्न’ योजनेच्या अधिकार्यांची उजळणी घेत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकर्यांनी हळद लागवड केली आहे, त्यांना हळद प्रक्रिया प्रशिक्षण द्या, अश्या सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या. तसेच हळद उत्पादकांच्या शेतीला तिलारी पकल्पाचे पाणी कसे मिळेल, यासाठी नियोजन करा, अश्या सूचना आ. केसरकर यांनी तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांना केल्या.
हत्तीप्रश्नी वनमंत्र्यांसोबत बैठक घेणार!
खानापूरच्या धर्तीवर तिलारी खोर्यात हत्ती पकड मोहीम राबवावी, या मागणीसाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच 10 फेब्रुवारीपासून वन कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत. या बाबत आ.केसरकर म्हणाले, या प्रश्नी आपण वनमंत्री गणेश नाईक यांच्याश चर्चा केली असून येत्या आठ दिवसात ना. नाईक यांच्या सोबत मंत्रालयात अधिकार्यांची विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले.