जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या 7 घुसखोरांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात कुख्यात बॅटच्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 पाकिस्तानींना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले आहे. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीममधील दहशतवादीही आहेत.
सुरक्षा दवल सतर्क असल्याने त्यांनी 4-5 फेब्रुवारीच्या रात्री नियंत्रण रेषेवरील त्यांच्या चौकीवर पाकिस्तानी घुसखोरांचा हल्ला उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत 7 पाकिस्तानी घुसखोरांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. या घुसखोरांमध्ये 2 ते 3 पाकिस्तानी लष्करी सैनिकांचा आणि कुख्यात BAT चाही समावेश होता. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅली सेक्टरमध्ये ही घटना घडली.
बॉर्डर अॅक्शन टीमच्या (BAT) च्या मदतीने हिंदुस्थानी लष्कराच्या पथकावर हल्ला करण्याचा पाकिस्तानी घुसखोरांचा डाव होता. त्यांना नियंत्रण रेषेवरून छुप्या पद्धतीने हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे. आता त्यांना पुन्हा एकदा हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांना ल्क्ष्य करायचे होते. मात्र, सतर्क असलेल्या हिंदुस्थानी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांचा जाव उधळून लावाला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी घुसखोर दिसताच सुरक्षा दलाने कारवाई करत त्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांमध्ये अल-बद्र या दहशतवादी संघटनेचे दहशतवादीही असल्याची माहिती मिळाली आहे.