सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी परभणीपासून मंत्रालयापर्यंत लाँगमार्च:दररोज 30 किमी अंतर चालून 16 फेब्रुवारीला मुंबईत धडकणार
3 hours ago
1
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होऊन एकमहिना झाला, तरी दोषी पोलिसांवर कारवाईझालेली नाही. या घटनेतील सर्व दोषींवरकठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठीआंबेडकरवादी नेते आणि संघटनांनी लाँगमार्चकाढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारीपरभणीतील धरणे आंदोलन स्थळावरून हालाँगमार्च दुपारी ३ वाजता मुंबईतीलमंत्रालयाकडे रवाना झाला. त्यात हजारोअनुयायी सहभागी झाले आहेत. लाँगमार्चरवाना होण्यापूर्वी पोलिस आणिआंदोलकांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामृत्यूप्रकरणी अद्यापही चौकशी अत्यंतसंथगतीने चालू आहे. चौकशी कुठपर्यंतआली याबद्दल माहिती प्रशासनाने दिलेलीनाही. सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांना एककोटीची नुकसान भरपाई द्यावी, दंगलीतविद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागेघ्यावे, दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, याप्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी अनुयायांनीलॉँगमार्च काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी१७ जानेवारीला परभणीतील डॉ. बाबासाहेबआंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाल्यानंतरहा लॉँगमार्च मंत्रालयापर्यंत जाणार आहे.लॉँगमार्च जसा पुढे जाईल, तशी सहभागीआंदोलकांची संख्या वाढेल, असे संयोजनसमितीने सांगितले आहे. सुधीर साळवे,आकाश लहाने, राहुलकुमार साळवे, गौतममुंढे, सुधीर कांबळे यांच्यासह हजारो अनुयायीसहभागी झाले आहेत. टाकळीत पहिला मुक्काम परभणीतून सुरु झालेल्यालाँगमार्चचा पहिला मुक्काम १०किमीवरील टाकळी (कु) येथेझाला. १८ रोजी दुसरा मुक्कामबोरी, ५० किमीवरील रांजेगाव येथेतिसरा, २० रोजी देवगाव फाटा येथे७० किमीवर चौथा मुक्काम आहे.आशिष वाकोडे हे लॉँगमार्चचेनेतृत्त्व करत आहेत. मुंबईत न्याय न मिळाल्यासदिल्लीत संसदेवर धडक मुंबईत मागण्या मान्य न झाल्यासलॉँगमार्चसाठी दिल्लीकडे रवानाहोईल. त्यावेळी काँग्रेस नेतेखासदार राहुल गांधी, नाना पटोले,बाळासाहेब थोरात यांच्यासह इतरनेते सहभागी होतील. न्यायमिळवण्यासाठी संसदेवर धडकदिली जाणार आहे. वाटेत भोजन, निवास व्यवस्था परभणीतून सुरुवात झाल्यानंतर लाँगमार्च जिंतूर-जालना -छत्रपती संभाजीनगर-नाशिकमार्गे मुंबईतील मंत्रालयावर १६ फेब्रुवारीला धडकणार आहे,अशी माहिती आशिष वाकोडे यांनी दिली.दररोज ३० किमी अंतर पायी कापले जाणारआहे. वाटेत जागोजागी लाँगमार्चमध्येसहभागी आंदोलकांची निवासाची आणिभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)