हिंगोलीत कडाक्याच्या थंडीतही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा:मुस्लिम बहुल केंद्रावर मोठी गर्दी, मतदान प्रक्रिया शांततेत सुरु

3 days ago 2
हिंगोली शहरासह जिल्हाभरात बुधवारी ता. 20 सकाळी कडाक्याच्या थंडीतही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या आहेत. विशेषतः मुस्लीम बहुल मतदार संघात मतदान केंद्रावर अधिक गर्दी होती. सकाळी सात वाजल्यापासून जिल्हाभरातील मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरु झाले आहे. हिंगोली जिल्हयात हिंगोलीसह वसमत व कळमनुरी विधानसभेसाठी निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. तीनही विधानसभा मतदार संघात एकूण 53 उमेदवार निवडणुक रिंगणात असून 9.84 लाख मतदार मतदान करणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मतदान कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना मंगळवारी ता. 19 मतदान केंद्रावर रवाना केले आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजता जिल्हयातील 1015 मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरु झाले आहे. मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार समर्थकांची गर्दी असून मतदानासाठी आलेल्या मतदारांना कुठल्या केंद्रावर नांव आहे याची माहिती दिली जाऊ लागली आहे. सकाळी साडेसात वाजल्या पासूनच कडाक्याच्या थंडीत मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. विशेषतः मुस्लीम बहुल मतदान केंद्रावर महिला व पुरुष मतदारांच्या रांगा पहावायास मिळाल्या आहेत. तर इतर ठिकाणी थंडीमुळे तुरळक मतदार मतदानासाठी येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. मतदानासाठी ओळखपत्राचे 12 पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने मतदान ओळखपत्र नसलेल्या मतदारांकडून आधारकार्ड दाखवून मतदान केले जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी तसेच कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हेशाखेचे निरीक्षक विकास पाटील स्वतः मतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी करीत असल्याचे चित्र आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article