ज्योतिषशास्त्रात विविध पंचांगावरून ग्रहांची स्थिती पाहून त्याचा अनुमान बांधला जातो. द्रिक पंचांगानुसार, 16 डिसेंबर 2024 रोजी रात्री 1 वाजून 52 मिनिटांनी बुध ग्रह वृश्चिक राशीत मार्गस्थ होणार आहे. बुध ग्रह मार्गस्थ होता व्यापार, करिअर आणि आर्थिक स्थितीत बदल पाहायला मिळेल. नवग्रहांमध्ये बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा दिला गेला आहे. बुध हा ग्रह बुद्धी, व्यापार, एकाग्रता, बौद्धिक क्षमतेचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे बुधाची स्थिती जातकाच्या कुंडलीत खूपच महत्त्वाची ठरते. बुध ग्रहाच्या स्थितीत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये उलथापालथ होणार आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत बुध ग्रह हा वृश्चिक राशीतच असणार आहे. पण 26 नोव्हेंबरपासून वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. याच राशीत असताना 16 डिसेंबर रोजी बुध ग्रह हा मार्गस्थ होईल. बुध ग्रह मार्गस्थ होताच काही राशींचं नशिब फळफळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना लाभ मिळणार ते..
या राशींना मिळणार लाभ
वृषभ : या राशीच्या सप्तम स्थानात बुध ग्रह मार्गस्थ होणार आहे. बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव या राशीवर राहील. सप्तम स्थान हे जोडीदाराशी निगडीत असते. त्यामुळे भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच काही जातकांना नोकरीची संधी मिळू शकते. या कालावधीत आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
मिथुन : या राशीच्या षष्टम स्थानात बुध ग्रह मार्गस्थ होणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक कामाच्या ठिकाणी होईल. तुम्हाला दिलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडाल.वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही चढ-उतार पाहायला मिळतील. पण आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारलेली असेल.
सिंह : या राशीच्या चतुर्थ स्थानात बुध ग्रह मार्गस्थ होणार आहे. भौतिक सुखांशी निगडीत असलेले हे स्थान आहे. काही चांगल्या घडामोडी घडतील. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात अनपेक्षितपणे लाभ मिळू शकतो. आरोग्यविषयक तक्रारी दूर होऊ शकतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)