मुंबई : येथील प्रदेश कार्यालयात भाजपचा विजयोत्सव गोड करण्यासाठी जिलबी तळताना देवेंद्र फडणवीस. सोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.pudhari photo
Published on
:
23 Nov 2024, 11:50 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:50 pm
मेरा पानी उतरता देख
मेरे किनारेपर घर मत बसा लेना
मैं समुंदर हूँ
लौटकर फिर आऊंगा!
या ओळी एकदा विधानसभेच्या कामकाजादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ऐकवल्या होत्या. त्याही निकालानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ‘मी पुन्हा येईन’ हा त्यांचा एकेकाळी गाजलेला व्हिडीओ तर शनिवारी निकालाच्या दिवशी सोशल मीडियावर ‘धूम मचा ले धूम ’चालला. सोशल मीडियावर देवाभाऊंचीच धूम होती! देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केल्यानंतर... ‘मी पुन्हा येईन’ला सोशल मीडियावर अक्षरश: पेव फुटले!
दुसरीकडे स्वत: फडणवीस शनिवारी म्हणाले, ‘मी पुन्हा येईन,’ या माझ्या वाक्यात काहींनी दर्प शोधला खरा; पण यात महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी येईन, हेच खरे सांगणे होते. 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपने राज्यात 100 हा नंबर ओलांडला आहे.
महाराष्ट्रात आजवर फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षे कार्यकाळ सलग पूर्ण करता आला आहे. एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी. मुख्यमंत्रिपदाची लालसा माझ्यात नाहीच. जनसेवेची महत्त्वाकांक्षा म्हणाल तर हे झपाटलेपण माझ्यात कधीही कमी होणार नाही, अशीही फडणवीस यांची प्रतिक्रिया होती.