Akola: जादूटोणा, पैशाचा पाऊस, गोवंश चोरी आणि एकाचा मृत्यू

7 hours ago 1

Akola:- 21 व्या शतकातील पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा तंत्र मंत्र असू शकते भयावह बाब आहे. पातूर तालुक्यातील सावरखेड या दुर्गम भागात आज पहाटे चार वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. संशयास्पद परिस्थितीत घडलेल्या या घटनेला जादूटोणा आणि गोवंश चोरीचा रंग लागल्याचे समोर आले आहे.

एका व्यक्तीचा तोल जाऊन तो कोसळला दरीत

सावरखेड हे गाव अतिशय दुर्गम आणि विरळ लोकवस्तीचे आहे. गाव जंगल (Forest)परिसरात असल्याने येथे फारसा वावर नसतो. गुरुवारी मध्यरात्री काही जण चारचाकी वाहनातून जंगलात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक जादूटोणा करून “पैशाचा पाऊस” पाडण्याचा प्रयत्न करीत होते, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे. मात्र, गावकऱ्यांना संशय आला की हे लोक गोवंश चोरी करण्यासाठी आले आहेत. गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतल्याने संशयितांनी गाडी सोडून पळ काढला. पळून जात असताना, यातील एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव रहेमत खान हमीद खान असे असून, तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जादूटोण्याचा संशयः

संशयित व्यक्ती जंगलात जादूटोणा करण्यासाठी आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या व्यक्तींनी “पैशाचा पाऊस” पाडण्यासाठी काही विधी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, गावकऱ्यांनी हा प्रकार गोवंश चोरीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.

गावकऱ्यांची कारवाईः

गावकऱ्यांना जंगलातील हालचालींचा संशय आल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या हालचाली लक्षात येताच संशयितांनी गाडी सोडून जंगलातून पळ काढले. पळून जात असताना, यातील एका व्यक्तीचा तोल जाऊन तो दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मृतदेह जंगलात सापडला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article