मतदार जनजागृतीत उल्लेखनीय कार्य!
विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली
अमरावती (Amravati Assembly Election) : विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढल्याने मतदार जनजागृतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमरावती तालुका स्विप कक्षाचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात गुरुवारी हा सन्मान सोहळा पार पडला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुकीच्या (Amravati Assembly Election) पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अमरावती तालुका स्वीप कक्षांतर्गत दररोज शाळा किंवा गावात विविध उपक्रम राबविले होते. त्यात चित्रकला व मानवी साखळी, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी काढून मतदार जनजागृती करण्यात आली. यादरम्यान, अमरावती तालुका स्वीप कक्षाच्या पथनाट्याने धूम केली होती. ‘चुलीत गेली दारू अन् चुलीत गेलं मटण, मी दाबेल निवडणुकीत मतदानाचं बटण’ म्हणत गावागावातील चौकाचौकात धमाल उडविली होती. त्याचा प्रभाव मतदारांवर झाल्याने विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली.
गटासाधन केंद्राच्या वैशाली वऱ्हाडे, नलिनी गोरे, कविता उघडे, अश्विनी पोकळे, सारिका काळे, संगीता रूपनारायण, सचिन वानखडे यांनी गावोगावी जाऊन पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
तालुका स्विप अंतर्गत मतदार (Amravati Assembly Election) जनजागृतीसाठी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांच्या मार्गदर्शनात तालुका नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर खोडे, स्वीप कक्षाचे प्रसिद्ध प्रमुख विनायक लकडे, अफसर खान, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह विविध कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.
दरम्यान, जिल्हा स्विप कक्षातर्फे विधानसभा मतदारसंघात मतदार (Amravati Assembly Election) जनजागृतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमरावती तालुका स्विप कक्षाचे नोडल अधिकारी धनंजय वानखडे, सुधिर खोडे, विनायक लकडे, संदिप बोडखे यांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.