गर्दीचा वीस वर्षांचा रेकॉर्ड मोडला
बैलगाडा शर्यतीत आली रंगत
शेकडो बैलगाडा स्पर्धकांचा सहभाग
चांदुर बाजार (Bahiram Shankarpat) : बहिरमची यात्रा म्हटलं की, प्रहारच्या शंकरपटाची धूम पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक आणि शेतकरी या यात्रेत येतात. २१ जानेवारीपासून सुरू असलेल्या प्रहारच्या शंकरपटाला बघण्यासाठी प्रेक्षक आणि शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली आहे. शेकडो बैलगाडा स्पर्धकांनी शंकरपटात सहभाग घेतला असून गर्दीने वीस वर्षांचा रेकॉर्ड मोडल्या गेला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित या (Bahiram Shankarpat) शंकरपटात बैलगाडा स्पर्धकांचा उत्साह देखील पाहण्यासारखा होता.
पहिल्या दिवसापासूनच या (Bahiram Shankarpat) शंकरपटाला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले.पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या शंकरपटात सहभाग घेतला आहे. एकापेक्षा एक सरस अश्या बैलजोड्या या स्पर्धेत उतरल्या असून हा शंकरपट सध्या बहिरम यात्रेचे आकर्षण ठरत आहे. या (Bahiram Shankarpat) शंकरपटात गणेश कावलकर, वाढोना यांच्या -लकी- चिमणा या जोडीने ६.५२ सेकंद ( क – गट)मोहसीन पटेल, जांभळी यांच्या देवाभाई – मैभ्या या जोडीने ६.५५सेकंद (अ गट), कु. मिशु अनविका राठोड यांच्या मिसाईल – देवा य जोडीने ६.५२ सेकंद (अ.गट) प्रशांत हरिभाऊ मोरे, बुलढाणा भीमा – लाडक्या या जोडीने ६.४९ वायूवेगाने अंतर कापून अंतिम सामान्य प्रवेश केला आहे.
उद्या या (Bahiram Shankarpat) शंकरपटाचा अंतिम सामना असून अतिशय रंगत या शंकरपटाला येणार आहे. गुरुवारी नियोजित वेळेवर अंतिम शर्यत खेळल्या जाईल व त्यांनतर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे.दोन दिवस अत्यंत उत्साहपूर्ण सुरू असलेल्या या (Bahiram Shankarpat) शंकरपटाला बघण्यासाठी दूरवरून प्रेक्षक व शेतकरी उपस्थित झाले असून दोन्ही दिवस गर्दीने वीस वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. बच्चू कडू यांनी बहिरम यात्रेमध्ये विविध उपक्रम राबविले असून नागरिक भाविकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात त्या उपक्रमांचा लाभ घेतल्याजात आहे.