आज आ. राम भदाणे यांच्या हस्ते मंजुरी पत्र वारसदार चित्राबाई दिनकर पाटील व श्रावणी मिलिंद पाटील यांना देण्यात आले.file
Published on
:
06 Feb 2025, 10:25 am
Updated on
:
06 Feb 2025, 10:25 am
धुळे | तालुक्यातील धामणगाव येथील पिता पुत्र पाण्यात वाहून मृत झालेल्या त्यांच्या वारसाना प्रत्येकी चार लाख रुपये असे एकूण आठ लाख रुपये शासनाने मंजुर केले आहेत. आज आ. राघवेंद्र (राम) भदाणे यांच्या हस्ते तहसीलदार यांच्या उपस्थितीत मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
धुळे तालुक्यातील मौजे धामणगाव येथील रहिवाशी दिनकर लाला पाटील (वय ७५) व त्यांचा मुलगा मिलिंद दिनकर पाटील (वय ४०) हे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी वणी खू. शिवरातील शेतातून परत येत होते. दरम्यान बोरी नदीवरील वणी-धामणगाव फरशी पूल ओलांडत असतांना पाण्यात वाहून गेले. यात दोघ पिता पुत्र मयत झाले होते. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली होती. कुटूंबातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबांवर दुःखचा डोंगर कोसळला होता. घटनेचा पंचनामा करून शासकीय मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. दरम्यान आ. राम भदाणे यांनी मयत वारसाना मदत मिळावी म्हणून प्रकरणा विषयी गेल्या दोन महिन्यापासुन पाठपुरावा सुरु होता. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या नुसार मयत पिता पुत्रांच्या वारसाना प्रत्येकी 4 लाख रुपये असे एकूण आठ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आज आ. राम भदाणे यांच्या हस्ते मंजुरी पत्र वारसदार चित्राबाई दिनकर पाटील व श्रावणी मिलिंद पाटील यांना देण्यात आले. यावेळी धुळे ग्रामीणचे तहसीलदार अरुण शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्रा. अरविंद जाधव, माजी जि प सदस्य आशुतोष पाटील, माजी प स सभापती विद्याधर पाटील व मयत्यांचे वारसदार व नातेवाईक उपस्थित होते.