मनोरुग्ण युवतीवर सामूहिक बलात्कार, संशयितांच्या मुसक्या आवळल्या File Photo
Published on
:
24 Jan 2025, 10:48 am
Updated on
:
24 Jan 2025, 10:48 am
मडगाव : बेतालभाटी समुद्र किनाऱ्यावरील सामूहिक बलात्काराच्या धक्क्यातून दक्षिण गोवा सावरत आहे ,तोच आता फातोर्डातील एका मनोरुग्ण युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने दक्षिण गोवा पुन्हा हादरला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना साकवाळ येथील फ्लॅटवर घडली आहे. चार नराधमांनी त्या पीडितेचे अपहरण करून जबरदस्तीने तिला फ्लॅटवर नेत तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली आहे.
आदिल अलगर (वय १८), मोहम्मद अली मुल्ला (वय २२) शहजाद शेख वय१८), वीरेश आग्वांदा (वय १८) आणि मोहम्मद शेख (वय १८) अशी संशयितांची नावे आहेत. ते सर्वजण वास्को येथील राहणारे आहेत.
सविस्तर माहितीनुसार, या पाचही जणांनी पीडितेच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीचा फायदा उठवत फातोर्ड्यातून तिचे अपहरण केले व तिला साकवाळ येथील फ्लॅटवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या घटनेबाबत फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली. पोलिसांनी तत्काळ पाऊल उचलत सर्व नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.