जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
:
25 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:30 am
Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : कार्यक्षेत्रात आज घेतलेले निर्णय योग्य ठरतील
मेष File Photo
मेष : कार्यक्षेत्रात आज घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तरुणांना मुलाखतींमध्ये यश मिळेल. आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करा. भावनेच्या आहारी जावून घेतलेल्या निर्णयामुळे तुमचे नुकसान होईल. कोणतीही बेकायदेशीर कामे टाळा. अन्यथा तुमची प्रतिमा खराब होवू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणा
वृषभFile Photo
वृषभ : तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. यामुळे दीर्घकाळापासून असलेली चिंता दूर होईल. मुलांच्या करिअरबाबत थोडी चिंता राहील. इतरांच्या कामात जास्त ढवळाढवळ करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. इतरांवर विसंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा. व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. कुटुंबासाठी आज वेळ द्यावा लागेल.
मिथुन : तुमच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बाबींचे कौतुक होईल
मिथुनFile Photo
मिथुन : मागील काही काळापासून सुरु असलेली कोंडी आणि अस्वस्थता दूर होऊ शकते. तुमच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बाबींचे कौतुक होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि सल्ले तुमच्यासाठी लाभदायक ठरेल।. घराच्या देखभालीशी संबंधित कामांमध्ये निराशा येऊ शकते. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. नात्यात गैरसमज होऊ देऊ नका. रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. मुलांना मिळालेल्या यशाने घरात उत्सवाचे वातावरण असेल.
कर्क : आज कुटुंबातील प्रश्न सोडविण्यास तुम्ही प्राधान्य द्याल
कर्कFile Photo
कर्क : आज कुटुंबातील प्रश्न सोडविण्यास तुम्ही प्राधान्य द्याल. वारशाने मिळालेल्या संपत्तीच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता. नातेसंबंधात सुधारणा होईल. खर्चाच्या बाबतीत उधळपट्टी करू नका; अन्यथा खराब बजेटमुळे तुम्हाला पश्चाताप होईल. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन तुमची वैयक्तिक कामे पूर्ण करण्यावर भर द्या. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांना सहकार्य लाभेल.
सिंह : आज कोणतेही पैशाचा व्यवहार करू नका
सिंहFile Photo
सिंह : शुभचिंतकांच्या आशीर्वादाने आज तुम्ही स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवाल. कामाप्रती समर्पित राहिल्याने तुम्हाला यश मिळेल. नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ आहे. तुमच्या विशेष योजना कोणालाही उघड केल्याने तुमच्यासाठी त्रास होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. आज कोणतेही पैशाचा व्यवहार करू नका. नातेवाईकाच्या आगमनाने तुमची दिनचर्या विस्कळीत होऊ शकते. व्यवसायातील मेहनतीला मनाप्रमाणे यश मिळेल. पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहिल.
कन्या : आजचा दिवस अनुकूल आहे
कन्याFile Photo
कन्या : आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या क्षमता आणि कौशल्यांचा पुरेपूर वापर करा. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन आणि सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. तुमची कामे मार्गी लावण्यासाठी स्वभावात लवचिकता ठेवा. तुमच्या उदार स्वभावाचा कोणी गैरफायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्या. भविष्याशी संबंधित कोणतीही योजना तूर्तास स्थगित करणे योग्य ठरेल. एखाद्या समस्येवर पती-पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता.
तूळ : निष्काळजीपणामुळे तुमची कामे अपूर्ण ठेवू नका
तूळ File Photo
तूळ : आज कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्याने घरातील वातावरण सकारात्मक होईल. बहुतेक वेळ कुटुंबासह व्यतित कराल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. अहंकार टाळा. निष्काळजीपणामुळे तुमची कामे अपूर्ण ठेवू नका. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. वैवाहिक संबंध मधुर होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या जबाबदारीची जाणीव ठेवा
वृश्चिकFile Photo
वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या जबाबदारीची जाणीव ठेवा. नियोजन आणि शिस्तीने नियमित दिनचर्या सांभाळा. वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. जवळच्या मित्राचा पाठिंबाही तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. घरातील मोठ्या सदस्यांचा आदर कमी होऊ देऊ नका. जुना भूतकाळ वर्तमानाला ओलांडून समस्या वाढवू शकतो. मुलांबाबतच्या अपूर्ण आशांमुळे मन उदास राहू शकते. वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही यावेळी व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.
धनु : आज तुम्हाला आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात विशेष रुची राहील
धनुFile Photo
धनु : आज तुम्हाला आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात विशेष रुची राहील. तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल. तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. गैरसमजामुळे भावंडांच्या नात्यात दरी वाढू शकते, याची जाणीव ठेवा. प्रॉपर्टीशी संबंधित कामांमध्येही गुंतवणूक करू नका. कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे यश मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो.
मकर : ग्रहस्थिती तुमच्या कलागुणांना आणि क्षमतांना बळ देत आहे
मकरFile Photo
मकर : ग्रहस्थिती तुमच्या कलागुणांना आणि क्षमतांना बळ देत आहे. घर बदलासंबंधी काही योजना असल्यास वेळ अनुकूल आहे. धार्मिक स्थळी थोडा वेळ घालवल्यास मानसिकदृष्ट्या अधिक सकारात्मक वाटेल. अज्ञात व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचा संपर्क तुम्हाला हानी पोहोचवू शकतो. स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुखसोयींवर खर्च करताना तुमच्या बजेटची काळजी घ्या. छोट्या छोट्या गोष्टींमुळे निराश होऊ नका. कार्यक्षेत्रात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य चर्चा करा. जवळच्या नातेवाईकाच्या भेटीने आनंद मिळेल.
कुंभ : इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करू नका
कुंभFile Photo
कुंभ : मागील काही काळापासून सुरू असलेल्या व्यस्त दिनचर्येतून विश्रांती घेण्यासाठी थोडावेळ मनोरंजनात व्यतित करा. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण मिळेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैवाहिक जीवनात विभक्त होण्याच्या समस्येमुळे मन अस्वस्थ होईल. इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करू नका. कोणाचे काय म्हणणे आहे हे समजून घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. व्यवसायात तुमच्या प्रयत्नांनुसार यश मिळेल.
मीन : आज मुलांविषयक प्रश्नांवर तोडगा निघाल्याने दिलासा मिळेल
मीनFile Photo
मीन : आज मुलांविषयक प्रश्नांवर तोडगा निघाल्याने दिलासा मिळेल. तुमच्या क्षमतेनुसार काही महत्त्वाचे निर्णय घ्या, प्रलंबित पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काहीवेळा तुमची अति शिस्त इतरांना त्रास देऊ शकते, याची विशेष काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कामात अडकू नका. व्यावसायिक कार्यात अनुभवी कर्मचारी आणि घरातील व्यक्तींच्या निर्णयांना प्राधान्य द्या.