अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवानाpudhari
Published on
:
19 Nov 2024, 9:43 am
Updated on
:
19 Nov 2024, 9:43 am
जळगाव | जळगाव जिल्ह्यामधील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी 21 हजार 876 कर्मचारी हे 4415 मतदार यंत्र, 4783 व्हीव्हीपॅड घेऊन आपापल्या मतदार संघाच्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव येथील वाटप केंद्रावर जाऊन स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली व कर्मचाऱ्यांशी बातचीत केली. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा काढली.
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रामधील 139 उमेदवार रिंगणात आहे. यापैकी 36 हे देशपातळीवरील व राज्य पातळीवरील पक्षाचे उमेदवार असून 103 अपक्ष उमेदवार आहेत. यांच्यासाठी दि. 20 रोजी होणाऱ्या मतदानासाठी अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रामध्ये 4415 मतदान केंद्रांवर 21,786 कर्मचारी मतदान यंत्र व व्हि व्हि पॅड घेऊन क्रुझर बस व इतर वाहनांनी रवाना झाले आहेत. जळगाव येथील मतदान मशीन वाटप ठिकाणी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जावून पाहणी केली. यावेळी शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला व त्यांनी स्वतः यंत्रणाची पाणी गेली
चोपडा मतदान केंद्र 404 मतदान 331384
रावेर मतदान केंद्र 393 मतदान 309536
भुसावळ मतदान केंद्र 381 मतदान 316307
जळगाव शहर मतदान केंद्र 433 मतदान 433437
जळगाव ग्रामीण मतदान केंद्र 423 मतदान 337368
अमळनेर मतदान केंद्र 390 मतदान 308172
एरंडोल मतदान केंद्र 357 मतदान 293551
चाळीसगाव मतदान केंद्र 412मतदान 375011
पाचोरा मतदान केंद्र 426 मतदान 333860
जामनेर मतदान केंद्र 410 मतदान 335274
मुक्ताईनगर मतदान केंद्र 386 मतदान 304064