परभणी (Parbhani) :- आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ पाच दिवसांच्या परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर येणार आहे. ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनात विपश्यना ध्यान प्रशिक्षण शिबिरांचे (Meditation grooming camps) आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक बुद्धाज लाईट इंटरनॅशनल असोसिएशन चाप्टर महाराष्ट्र चे संचालक भीमराव वायवळ यांनी केले आहे.
म्यानमार,थायलंड,जपान येथील भिक्खू संघ सहभागी होणार
अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनात पाच दिवसीय धम्म दौर्यात थायलंड, जपान, व्हिएतनाम, अमेरिका, म्यानमार, तैवान आदी राष्ट्रांतील भिक्खू संघाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ आणि दुपारी १ ते ५ भदंत उपाली थेरो नगरी बुद्ध विहार पूर्णा
८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ परभणी सुजाता कॉलनी बुद्ध विहार. सायंकाळी ६ ते ९ म. फुले कॉलनी बुध्द विहार,
९फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ हॉलिडे फन पार्क एमआयडीसी परिसर परभणी
१० फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ उदय लक्ष्मी स्पर्धा परीक्षा केंद्र गंगाखेड रोड परभणी
११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते १ बुध्द विहार सनपूरी ता जि.परभणी. सायंकाळी ५ ते ७ नालंदा विपश्यना केंद्र रविराज पार्क परभणी येथे भिक्खु संघ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
या शिबिरात परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व समाज कल्याण अधिकारी हिंगोली उमेश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच डॉ अशिम उत्तम तारा सयाडो यांचे म्यानमारमध्ये १०० मेडिटेशन सेंटर(Meditation Center) आहेत. त्यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ धम्म दौर्यावर येत आहेत. विविध ठिकाणी होणार्या विपश्यना प्रशिक्षण धम्म शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भीमराव वायवळ यांनी केले आहे.