प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. आजकाल पार्लरमध्ये फेशियल आणि क्लीनअपसाठी लोक तासन् तास घालवतात त्यासोबतच हजारो रूपये खर्च करतात. मात्र, पार्लरमधील महागड्या आणि रसायनिक क्रिम्समुळे तुमचा चेहरा खराब होऊ लागतो. निरोगी त्वचेसाठी त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी त्वचेसाठी अशा अनेक घरगुती टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. चाहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग करता. पंरतु, बाहेरच्या सूर्य प्रकाशामुळे चेहरा टॅन होऊ लागतो. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी म्हणून तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता.
कच्च्या दुधाचा वापर तुमच्याा त्वचेसाठी अत्यंत फयदेशीर ठरू शकतो. कच्च्या दुधाचा वापर केल्यास तुमच्या त्वचे संबंधीत समस्या दूर होण्यास मदत होते. कच्च्या दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पार्लर सारखी चमक येते. तुम्ही जर घरच्या घरी चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कच्च्या दुधाचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेवरील छिद्र उघडून खोलवर साफ करते. चेहऱ्यावरील छिद्र साफ झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते.
तुमच्या चेहऱ्यावर कच्च्या दुधाचा वापर केल्यामुळे तुमच्या चेऱ्यवरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. कच्च्या दुधाचा चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहाण्यास मदत होते. कच्च्या दुधाचा चेहऱ्यावर वापर केल्यास त्वचा हायड्रेटेड राहाते आणि कोरडी होत नाही. चेहऱ्यावरील काळ्या डागांवर कच्च दूध लावल्यामुळे त्याचा रंग हलका होण्यास मदत होते. तसेच तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात सुरकुत्या असतील तर चेहऱ्यवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर कच्च्या दुधाचा वापर केल्यास त्वचेवरील जळजळ कमी होते आणि त्वचा मऊ होते. कच्च्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे मुरुमे दूर होण्यास मदत होते. कच्च्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असते ज्यामुळे चेहऱ्यावरील ड्राय स्किन निधून जाते.
हे सुद्धा वाचा
कच्च्या दुधाने फेशियल करण्याच्या टिप्स :
फेशियल करताना नेहमी ताजे कच्चे दूध वापरा…
संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी कच्च्या दुधाची पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
आठवड्यातून एक किंवा दोनदा कच्च्या दुधाने फेशियल करा.