‘द स्टुडंट्स मार्ट’ अभिनव उपक्रम
८ डिसेंबरला मुबई येथे वितरण सोहळा
देशोन्नती वृत्तसंकलन
अमरावती (Sharad Pawar Fellowship) : ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ ही शिक्षण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित फेलोशिप असून, शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रम राबवणाऱ्या व्यक्तींना दिली जाते.
शैक्षणिक क्षेत्रात अभिनव शालेय उपक्रम ‘द स्टुडंट्स मार्ट’ यशस्वीपणे राबविल्याबद्दल अमरावती कॅम्प परिसरातील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल येथील मंगेश मानकर यांची प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण सेंटर संचालित (Sharad Pawar Fellowship) ‘शरद पवार इन्स्पायर एज्युकेशन फेलोशिप 2025’ साठी निवड झाली आहे. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून ८ डिसेंबरला मुबई येथे एका सोहळ्यात फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे.
‘द स्टुडंट्स मार्ट’अमरावती शहरातील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल या शाळेत राबविण्यात येत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य शिकवण्यावर आधारित आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना वस्तूंची निर्मिती, व्यवस्थापन, विक्री कौशल्य , आणि ग्राहक सेवा यासारख्या कौशल्यांचा सराव करता येतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंपूर्णता, जबाबदारीची जाणीव, आणि उद्योजकतेची बीजे रोवली जातात. विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे राज्य पातळीवर कौतुक करण्यात आले आहे.
मंगेश मानकर यांनी शाळेतील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये या (Sharad Pawar Fellowship) उपक्रमाची अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना व्यावसायिक व आर्थिक जाणीव करून दिली. त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळाली असून, हा उपक्रम इतर शाळांसाठी आदर्श ठरला आहे. ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ (Sharad Pawar Fellowship) ही शिक्षण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित फेलोशिप असून, शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रम राबवणाऱ्या व्यक्तींना दिली जाते. या फेलोशिपअंतर्गत मंगेश मानकर यांना सदर शैक्षणिक उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन राज्य स्तरावर काम करण्याची संधी मिळणार आहे. मंगेश मानकर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांचे कार्य शिक्षण क्षेत्रातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
‘द स्टुडंट्स मार्ट’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवता आला, याचा मला अभिमान आहे. ही (Sharad Pawar Fellowship) फेलोशीप माझ्या कार्यावरचा विश्वास आणि जबाबदारी वाढवणारी आहे. ही फेलोशिप मला शिक्षण क्षेत्रात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा देईल.अशी प्रतिक्रिया मंगेश मानकर यांनी दिली.
मुबई येथे ८ डिसेंबरला वितरण सोहळा
सदर फेलोशिप प्रदान सोहळा येत्या 8 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, येथे पार पडणार आहे. शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, फेलोशीप प्रोग्राम चे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, तसेच एज्युकेशन फेलोशिप चे मुख्य समन्वयक विवेक सावंत यांच्या हस्ते ही फेलोशिप मंगेश मानकर यांना प्रदान केली जाणार आहे.
—————————————