दुसरा क्रमांक मिळवीत मैदान गाजविले
सांघिक व वैयक्तिक खेळात मिळविले अनेक पारितोषिक
सांघिक व वैयक्तिक खेळात मिळविले अनेक पारितोषिक
देशोन्नती वृत्तसंकलन
अमरावती (Sports-Cultural Festival) : जिल्हापरिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवात (Amravati Panchayat Samiti) अमरावती पंचायत समितीने वैयक्तिक व सांघिक खेळात धावपट्टी गाजवत मैदान मारले, तर सांस्कृतिक कार्यक्रमात करा ओके, सिनेगीत, युगलगीत, हास्यजत्रा व समूहनृत्याने धमाल उडवित उपविजेता पारितोषिक पटकाविले. जिल्हापरिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव (Sports-Cultural Festival) ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्साहात झाला.
अमरावती पंचायत समितीने वैयक्तिक खेळात लांब उडी मध्ये विजया सोळंके यांनी धावपट्टी गाजविली. त्यांनी वेगवान धावत प्रथम क्रमांक पटकावित विजयी मिळविला. तर, उंच उडी मध्येही उंच भरारी घेत विजया सोळंके यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवीत द्वितीय क्रमांकाच्या उपविजयी ठरल्या. भाला फेक या खेळात मुशीर खान प्रथम क्रमांकाच्या विजयाचे मानकरी ठरले. स्विमिंग 50 मीटर शर्यतीत नितीन नवाथे यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाले. दिव्यांग गटात गोळा फेक या खेळात सुशिला पाटील (Sports-Cultural Festival) द्वितीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
सांघिक खेळात कबड्डी महिला खेळ अत्यंत रोमांचकारी झाला होता. अमरावती विरुद्ध चिखलदरा असा अंतिम सामना झाला. या सामन्यात (Amravati Panchayat Samiti) अमरावती पंचायत समितीच्या संघाने दणदणीत विजय मिळवित प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. या संघाच्या हर्षा कोल्हे व त्यांच्यासाथीदारांनी कडवी झुंज देत विजय मिळविला. बॅडमिंटन दुहेरी खेळात वनिता बोराडे व उज्वला राऊत उपविजयी झाल्या. तर, बॅडमिंटन एकेरी मध्येही वनिता बोरोडे व उज्वला राऊत उपविजयी ठरल्या. टेबल टेनिस एकेरी या (Sports-Cultural Festival) खेळात उमेश खोडपे विजयी झाले. तर, टेबल टेनिस दुहेरी संघात उमेश खोडपे व प्रकाश रामटेके विजयी झाले. टेनिकवाईट पुरुष दुहेरी संघात ज्ञानेश्वर मोहोड व धनराज कुंजेकर उपविजयी झाले. टेनिकवाईट दुहेरी महिला खेळात सरोज घुटे व विजया सोळंके उपविजयी झाल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात (Sports-Cultural Festival) सिनेगीत मंगेश इंगळे यांनी सुमधुर आवाजात गायिले. तर युगलगीताचे शिक्षण विस्तार अधिकारी सुधिर खोडे व रोशनी निभोरकर यांनी बहारदार सादरीकरण केले, त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या गीताने प्रथम क्रमांक पटकावून अमरावती पंचायत समितीने सांस्कृतिक कार्यक्रमात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले व उपविजेता पारितोषिकाचा मानकरी ठरली.
विजयी सर्व खेळाडूंचे गटविकास अधिकारी डॉ. सुदर्शन तुपे, गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप बोडखे, सुधिर खोडे, केंद्रप्रमुख अजित पाटील, अफसर खान, मोहन जाधव, संजय कोकाटे, सुमती देखणे, स्मृती बाबरेकर, अनिल डाखोडे, नंदकुमार झाकर्डे, सुभाष सहारे, इकबाल पटेल, विनायक लकडे, मनोज खोडके यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख व कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.
मनोज खोडकेची आजोबा ची भूमिका लक्षवेधी ठरली
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चिंचखेड येथील शिक्षक मनोज खोडके यांनी हास्यजत्रा या नाटिकेत आजोबा ची भूमिका केली, त्यांचा अभिनय वाखण्याजोगा होता. त्यांच्या (Sports-Cultural Festival) अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.