मानोरा (Washim):- मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे फुलउमरी येथील ग्राम सचिव गब्बरसिंग आडे यांना वडिलोपार्जीत जागेच्या नमुना ८ – अ ची मागणी केली असता ते देण्यास दिरंगाई करीत असुन उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याबातबची चौकशी करून न्याय द्यावा व ग्राम साचिव विरूध्द कार्यवाही (Proceedings) करावी, असे निवेदन दि. ६ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी यांना डॉ सचिव उत्तमराव राठोड यांनी दिले आहे.
ग्राम सचिव विरुध्द कार्यवाही करण्याची मागणी
दिलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे की, फुलउमरी ग्राम पंचायत अंतर्गत पालकाची जागा वडीलोपार्जीत मिळालेली आहे. त्या जागेची तीन वर्षापूर्वी ग्राम पंचायत मार्फत तत्कालीन ग्राम सचिव यांच्या मार्फत मोजणी करून दस्तऐवज घेतले आहे. गुरुवारी दि. ६ फेब्रुवारीला सकाळी ग्रामसचिव आडे यांना ८ – देणेबाबत भ्रमणध्वनी(cell phone) वरुन बोललो असता उडवाउडवीचे उत्तर देवून पुन्हा फोन न करण्याचे सांगीतले. मागील सहा महिन्यापासून जागेचा मालमत्ता नमुना ८ – अ ची मागणी करून देखील मिळत नाही. तसेच याबाबत माहितीच्या अधिकारात अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागूनही माहिती दिली नसुन सुनावणी सबंधित गैरहजर होते.
यासंदर्भात अपिलीय अधिकारी यांनी सात दिवसात माहिती देण्याची मुभा दिली होती. परंतु तरीही माहिती न दिल्याने कलम १९ ( १ ) अन्वये राज्य माहिती आयुक्त अमरावतीद्वितीय अपील करण्याचे सुचविले आहे. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या ग्राम सचिव विरुध्द चौकशी समिती नेमून कार्यवाही करावी व न्याय द्यावा, असे तक्रार निवेदन डॉ राठोड यांनी दिले आहे.