मानोरा (Washim) :- येथील कृषि उत्पन्न बाजार (Agricultural nutrient market) समितीच्या यार्ड प्रांगणात दि. २१ जानेवारी रोजी ऑकशन शेड बांधकाम पायाभरणी समारंभ कार्यक्रम माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या हस्ते मान्यवर व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
सर्व संचालक मंडळींचे एकजुटीने प्रयत्न
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड होते. प्रमुख उपस्थितीत जि. प. चे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे, उपसभापती भुजंगराव राठोड, माजी सभापती प्रेमसिंग राठोड, माजी सभापती भास्कर शेगीकर, खरेदी विक्री अध्यक्षा सपना देशमुख, जिनिंग प्रेसिंगचें अध्यक्ष तथा संचालक अभिजीत पाटील, यशवंतराव इंगळे , विजय राठी, अरुण हेडा, अनिस शेख आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सुभाषराव ठाकरे म्हणाले की, बाजार समितीच्या विकासाचा कायापालट करण्यासाठी सर्व संचालक मंडळाने एकजुटीने प्रयत्न केल्यामुळे कोटी रुपयांचा शेड शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी उभा राहणार आहे.
सर्व संचालक मंडळाच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत व्यक्त
शेतकरी हा बाजार समितीचा कणा असुन त्यांची गैरसोय होऊ नये, याची सर्वांनी काळजी घेण्याचे सांगत बाजार समितीत विकासाच्या सुविधा आणण्यासाठी मी आणि अनिल राठोड अहोरात्र सोबत असल्याची ग्वाही दिली. अध्यक्षीय भाषणात अनिल राठोड म्हणाले की, आपल्या तालुक्यातील अती मागास भागातील शेंदुरजना आढाव येथे उपबाजार समिती विकास कामाला बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यामुळे येत्या काळात उपबाजार समिती त्या ठिकाणी उभी राहणार असल्याने हा सर्व संचालक मंडळाच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक सभापती डॉ संजय रोठे यांनी केले तर संचालन सचिव मनोज इंगोले यांनी मानले.