जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo
Published on
:
08 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
08 Feb 2025, 1:00 am
Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.
मेष : आरोग्याची काळजी घ्या
मेष File Photo
मेष : श्रीगणेश सांगतात की, आज उपलब्ध झालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. प्रलंबित आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जा. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : प्रवास टाळणे हितकारक ठरेल
वृषभFile Photo
वृषभ : आज आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल. नाते चांगले ठेवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. तरुणाईआपलं ध्येये साध्य करण्याचा प्रयत्न करतील. प्रवास टाळणे हितकारक ठरेल, असा सल्ला श्रीगणेश देंतात. पती-पत्नी संबंध चांगले राखता येतील.
मिथुन : आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा
मिथुनFile Photo
मिथुन : श्रीगणेश सांगतात की, घरी पाहुण्याचे आगमन झाल्याने दैनंदिन वेळापत्रकात बदल करावा लागेल. कोणावरही टीका करु नका. अन्यथा तुमची प्रतिमा डागळू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी पूर्ण काळजी घ्यावी.
कर्क : आहाराची काळजी घ्या
कर्कFile Photo
कर्क : आज मनोबलाच्या जोरावर तुम्ही नवीन यश मिळवू शकता. प्रभावशाली व्यक्तीबरोबर झालेली भेटीने उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. तुमच्या इच्छांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन करार होऊ शकतो. जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आहाराची काळजी घ्या.
सिंह : जोडीदाराशी थोडे मतभेद होऊ शकतात
सिंहFile Photo
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आर्थिक लाभ होईल. जवळच्या व्यक्तीला मदत केल्याने आनंद वाटेल. कोणावरही टीका करु नका, अन्यथा नात्यामध्ये बिघाडे होवॅ शकतो. भागीदारीशी संबंधित व्यवसायावर तुमची नजर असेल. जोडीदाराशी थोडे मतभेद होऊ शकतात. व्यायाम आणि योगावर लक्ष केंद्रित करा.
कन्या : दैनंदिन कामे सुरुळीत सुरू राहतील
कन्याFile Photo
कन्या : श्रीगणेश म्हणतात की, आज ज्ञानवर्धक आणि महत्त्वाची माहिती मिळविण्यात वेळ जाईल. प्रेरणादायी व्यक्तीबरोबरील भेटीने मनःशांती लाभेल. दैनंदिन कामे सुरुळीत सुरू राहतील. व्यवसायात व्यस्त असूनही तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. जोडीदाराचे घर आणि कुटुंबासाठी पूर्ण सहकार्य लाभेल. पोटदुखीचा त्रास जाणवेल.
तूळ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल
तूळ File Photo
तूळ : श्रीगणेश सांगतात की, आज स्वभावात केलेले सकारात्मक बदल कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिमा उंचावेल. व्यवसाय वाढीची योजना सुरू करण्याची योग्य वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. आहार घेताना काळजी घ्या.
वृश्चिक : बोलणे आणि रागावर नियंत्रित ठेवा
वृश्चिकFile Photo
वृश्चिक : श्रीगणेश म्हणतात की, आज धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. बोलणे आणि रागावर नियंत्रित ठेवा. व्यवसायात काही आश्चर्यकारक यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. वाहन चालवताना काळजी घ्या.
धनु : कौटुंबिक जीवन सामान्य राहिल
धनुFile Photo
धनु : श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस अनकूल आहे. नातेसंबंध अधिक दृढ होतील. काही व्यावसायिक सहली पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर : जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल
मकरFile Photo
मकर : श्रीगणेश म्हणतात की, ग्रहमान अनकूल आहे. खास व्यक्तींसोबत झालेली भेट लाभदायक ठरेल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण करताना अधिक मेहनत करण्याची गरज असते. मुलांसोबत ताणतणाव असेल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. कोणत्याही विषयावर जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. बदलत्या वातावरणाचा आरोग्यवर परिणाम होवू शकतो.
कुंभ : वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो
कुंभFile Photo
कुंभ : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या कुटुंब आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या योग्यरित्या हाताळाल. भावंडांसोबतचे संबंध थोडे बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो.
मीन : कामाच्या ठिकाणी अधिक मेहनतीची गरज आहे
मीनFile Photo
मीन : श्रीगणेश म्हणतात की, आज सकारात्मक विचारांमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक बदल होतील. कधीकधी तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रासदायक ठरु शकतो. स्वभावात थोडी लवचिकता ठेवा. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनतीची गरज आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी असेल.