जेव्हा आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतो. तेव्हा आपल्याला त्याचा फटका बसतो. नियमभंग केला म्हणून दंड वसूल करण्यात येतो. चुकीच्या दिशेने कार वळवली, चालवली. विना हेल्मेट वा सीट बेल्ट न लावता वाहन चालवले. वाहतूक सिग्नल लाल असताना वाहन नेले, अतिवेगाने वाहन चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चालान कापते. हे नियम अर्थातच रस्ते सुरक्षा आणि वाहन शिस्तीसाठी तयार करण्यात आले आहे. त्यामुळे अपघात टळतात. पण वाहतूक पोलिसांचा आगाऊपणा, हलगर्जीपणा, निष्काळजीपणा पण अनेकदा भोवतो. आता एका फॉर्च्युनर कार मालकाला विना हेल्मेट गाडी चालवल्याने पोलिसांनी चालान पाठवले. त्यामुळे आता काय करू नी काय नाही, असा त्रागा तो करत आहे.
गुरूग्राम पोलिसांचा प्रताप
गुरूग्राम वाहतूक शाखेची एक मोठी चूक समोर आली होती. पोलिसांनी बहादुरगड येथील एका फॉर्च्युनर मालकाला विना हेल्मेट वाहन चालवल्याचे कारण पुढे करत चालान फाडले. हे चालान मालकाच्या पत्त्यावर पोहचले. या चालानमध्ये एका मोटारसायकलचा फोटो दिसत आहे. पोलिसांनी या कार मालकाल चालानचे 1000 रुपये भरण्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. आता हे चालान पाहून फॉर्च्युन चालकाला हसावे की रडावे असा प्रश्न पडला आहे.
हे सुद्धा वाचा
चुकीच्या पत्त्यावर चालान
फॉर्च्युनरच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, त्याला 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:57 वाजता चालान मिळाले. हे चालान आपल्या पत्त्यावर का पाठवले असा प्रश्न त्याला पडला. कारण त्यावर दुचाकीचा फोटो होता. तसेच जो वाहन क्रमांक दिला होतो, तो सुद्धा त्याचा नव्हता. पोलिसांनी चुकीच्या पत्त्यावर हे चालान पाठवले होते. पण त्यावर त्याचे नाव असल्याने मोठी गडबड झाली होती. पोलिसांनी चुकून त्याच्या फॉर्च्युनरवर दुचाकीचे चालान फाडले होते. आता या मालकाने हे चुकीचे चालान रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी त्याला नाहक मनस्ताप होत आहे.
चालान रद्द करा
जर हे चालान भरले नाहीतर त्याला विलंब शुल्क, दंड द्यावा लागेल. शिवाय कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील ते वेगळंच. त्यामुळे विदाऊट हेल्मेट म्हणून जे चालान फाडण्यात आले आहे, ते रद्द करण्याची विनंती कार मालकाने केली आहे. पोलिसांनी सुद्धा ही चूक मान्य तर केली आहे, पण अद्याप चालान रद्द झाले नसल्याची माहिती समोर येत आहे.