इराणला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत इस्रायल

3 hours ago 1

इराणने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत इस्रायल आहे. Pudhari File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

10 Oct 2024, 11:59 pm

Updated on

10 Oct 2024, 11:59 pm

तेल अवीव; वृत्तसंस्था : इराणने केलेल्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत इस्रायल आहे. इराणवर कोणत्या पद्धतीने हल्ला करावा, हे निश्चित करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू मंत्रिमंडळाचे मतदान घेणार आहेत. तत्पूर्वी, नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कॅमला हॅरिस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही चर्चा सुमारे 30 मिनिटे करण्यात आली.

नेतान्याहू आणि बायडेन यांच्यात चर्चा झाली. यावेळी इराणवर पलटवार करण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले. इस्रायलला आपली सुरक्षा करण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचे बायडेन म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. यापूर्वी बायडेन म्हणाले होते की, इस्रायलने इराणच्या तेल आणि आण्विक ठिकाणांवर हल्ले करू नयेत. दुसरीकडे इस्रायलचे संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट म्हणाले की, इराणवर अचानक मोठा हल्ला करू. हिजबुल्लाहच्या हल्ल्यात पहिल्यांदाच इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. हिजबुल्लाह कडून डागण्यात आलेल्या रॉकेटमुळे किरयत शमोन परिसरात दोन इस्रायली नागरिक मारले गेले.

1,100 हून अधिक हवाई हल्ले

लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे दोन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू, तर दहा हजारहून अधिक लोक जखमी झालेले आहेत. गेल्या दहा दिवसांत लेबनॉनवर 1 हजार 100 हून अधिक हवाई हल्ले करण्यात आले आहे. गाझातील युद्ध आणि लेबनॉनमध्ये हल्ल्यांवरून बायडेन आणि नेतान्याहू यांच्यात अनेकवेळा चर्चा झाली आहे. नेतान्याहू यांच्यावर नाराज होऊन बायडेन खूपच संतप्त झाल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article