नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तर्क वितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र स्वतः फडणवीसांनी ठाकरेंना सोबत घेणार नाही म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला.
नागपूरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले होते. त्यावेळी ठाकरेंनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांच स्वागत केलं. त्यानंतर आदित्य ठाकरे देखील फडणवीसांना भेटले. त्यामुळे या भेटीगाठींवरून पुन्हा पॅचअप होतं की काय अशी चर्चा सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यानंतर तुर्तात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जर तरच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. उद्धव ठाकरेंशी संबंध खराब नाहीत पण याचा अर्थ लगेच सोबत घेणार अशी परिस्थिती नाही हे फडणवीसांनी स्पष्ट केलंय. एकत्र येणार आणि सोबत घेणार अशी स्थिती नाही हे मुख्यमंत्री फडणवीसांनी थेटच म्हटलंय. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतली चलबिचल निश्चितच थांबली असेल. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती शक्य नाही. भाजपही ठाकरेंना जवळ करणार नाही अशी टीका शिंदे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. दरम्यान महायुतीमध्ये आधीच तीन तीन पक्ष आहेत त्यावरून आधी खाटेवाटप आणि पुढे पालकमंत्री पदावरून रस्सीखेच आणि वादही झाले. त्यामुळे महायुतीची सत्ता शेअरिंगची क्षमता पूर्णपणे संपली आहे. तसं पाहिलं तर राजकारणामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता ठाकरेंना सोबत घेणार नाही हे फडणवीसांनी स्पष्ट केलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 06, 2025 11:00 AM