ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्यामुळे प्रदीपचा खून:रुमपार्टनर भाऊच आरोपी, आरोपी अल्पवयीन, पण सज्ञान समजून खटला चालवण्यासाठी प्रयत्न
3 hours ago
1
संक्रांतीच्या दिवशी उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनी येथे झालेल्या प्रदीप निपटे खुनाचा छडा लावण्यात तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश आले. प्रदीपचा मावसभाऊ असलेला रुमपार्टनर संदीप (अल्पवयीन असल्याने नाव काल्पनिक) यानेच हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे ऑनलाइन गेममध्ये हरलेल्या पैशांच्या व्यवहारातून आरोपीने खून केला. संशयित अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे. गुन्ह्याचे स्वरूप बघून अल्पवयीन मुलाला सज्ञान समजावे यासाठी पोलिस जिल्हा न्यायालयाला पत्र देणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. तीन दिवसांपासून ८ पथके या खुनाचा तपास करीत होती. यात प्रदीपचा मावसभाऊ असलेल्या रुम पार्टनरच्या जबानीत तफावत आढळल्याने संशय आला. त्यातून गुन्ह्याची उकल झाली. प्रदीप निपटे खून प्रकरण संदीप व प्रदीप एकाच मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत होते. संशयिताने त्यात १ लाख रुपये जिंकले. नंतर प्रदीप मात्र त्याच गेममध्ये ६५ हजार रुपये हरला. आपल्याला न विचारता गेम खेळला आणि पैसे हरला यामुळे दोन महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळेच संशयिताने प्रदीपच्या खुनाचा कट रचला आणि अत्यंत थंड डोक्याने हा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)